नागपूर : काल नागपुरात रात्री स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांना अटक करण्यात आली आहे. नागपूर पोलिसांनी रात्री 10 वाजून 20 मिनिटांनी ही अटक केली. कापूस आणि सोयाबीनच्या प्रश्नावर त्यांनी नागपुरात बेमुदत अन्नत्याग सत्याग्रह आंदोलनाला सुरू केलंय. मात्र, नागपुरातील तुपकरांच्या आंदोलनात 'हाय होल्टेज' नाट्य रंगल्याचं पाहायला मिळालं. अटक केलेल्या तुपकरांना रातोरात पोलीस बंदोबस्तात बुलडाण्याकडे रवाना करण्यात आलं आहे. 


Nagpur : रविकांत तुपकरांना आंदोलना दरम्यान पोलिसांनी उचलून नेले, तुपकरांची शुगर लो!


कापूस-सोयाबीन प्रश्नावर काल स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकरांनी बेमुदत अन्नत्याग सत्याग्रह आंदोलन सुरू केलं होतय. सरकारने कोरोना आणि जमावबंदीचं कारण देत तुपकरांच्या आंदोलनाला परवानगी नाकारलीय. आंदोलनादरम्यान काल रात्री 10 वाजून 20 मिनिटांनी तुपकरांना अटक करण्यात आली. प्रकृती खालावलेल्या तुपकरांना जबरदस्तीने उपचारांसाठी नागपुरात दवाखान्यात नेण्यात आलं. मात्र, त्यांनी उपचारास स्पष्ट नकार देत आपलं अन्नत्याग आंदोलन सुरूच ठेवलंय. अखेर सरकारने तुपकरांना रातोरात जबरदस्तीने पोलीस बंदोबस्तात बुलडाण्याकडे रवाना केलं. 


तोपर्यंत मी अन्नाचा कण खाणार नाही
तुपकर यांनी म्हटलं की, माझे अन्नत्याग सुरूच राहणार आहे. आता मी माझ्या निवासस्थानासमोर अन्नत्याग सत्याग्रह सुरू केला आहे. नागपूर येथील अन्नत्याग आंदोलनादरम्यान काल रात्री 10.30 वा. नागपूर पोलिसांनी मला ताब्यात घेऊन आज सकाळी बुलडाणा येथील माझ्या निवासस्थानी आणून सोडले. माझ्या घरासमोर नागपूर व बुलडाणा पोलिसांचा पहारा आहे. पोलिसांनी अशा कितीही कारवाया केल्या तरी मी माझ्या भूमिकेवर ठाम आहे. जोपर्यंत सोयाबीन-कापूस उत्पादकांना न्याय मिळणार नाही तोपर्यंत मी अन्नाचा कण खाणार नाही, अशी माझी भूमिका आहे.


अन्नत्याग आंदोलन केल्यामुळं रविकांत तुपकर यांची शुगर कमी झाली होती. पोलिसांनी तुपकर यांना आंदोलन मागे घेण्याची विनंती केली होती. पण तुपकर आंदोलनस्थळावरुन उठले नाहीत. त्यामुळं पोलिसांना अखेर कारवाई करावी लागली.