बाबानेच या आश्रमातला कोपरा न कोपरा पोलिसांना दाखवला.
महत्वाचं म्हणजे रात्री उशिरा ही झाडाझडती घेतली गेली, तेव्हाही या मठात बाबाच्या समर्थकांची मोठी गर्दी होती.
अश्लील शिव्या देऊन हा बाबा आपल्याला रोगमुक्त करतो, अशी इथल्या अनेक लोकांची धारणा आहे. याच अश्लील शिवीगाळाचा एक व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर बाबाविरोधात जादूदोणा विरोधी कायद्यातंर्गत कारवाई करण्यात आली आहे.
रत्नागिरीचा 'राम रहीम', पोलिसातून निवृत्त भोंदूच्या लीला
हरियाणातल्या बाबा राम रहीमनंतर आता रत्नागिरीतला एक बाबा वादात आला आहे. पूर्वी रत्नागिरी पोलिस खात्यात नोकरीला असलेला हा बाबा स्वतःला आधुनिक युगातील स्वामी समर्थांचा अवतार मानतो.
श्रीकृष्ण पाटील असं या बाबाचं नाव आहे. त्याच्या लीला रोज सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. रत्नागिरीतील झरेवाडीमध्ये या बाबाचा मठ आहे, तर दर गुरुवारी बाबाची वारी देखील असते.
मठाची झाडाझडती
बाबा श्रीकृष्ण पाटीलला पोलिसांनी काल रात्री मठात आणलं.
आपण कुठे बसतो, कुठून आदेश करतो, या सगळ्या ठिकाणांपासून कपडे बदलायची खोली, हे सर्व बाबाने दाखवलं.
आश्चर्याची गोष्ट म्हणजे इतकी मोठी कारवाई होत असतानाही बाबाच्या मठातील भक्तांची उपस्थिती कमी नव्हती.
या भक्तांच्या भावना खूप तीव्र होत्या, पण त्यांच्याच उपस्थितीत रत्नागिरी ग्रामीण पोलिसांनी बाबाच्या मठाला कुलूप लावत त्याचा ताबा घेतला.
कुणीही कसलाही विरोध करायचा नाही, पोलीस जे मागतील ते तपासासाठी त्यांना उपलब्ध करून द्या, असे आदेश बाबाने भक्तांना दिले होते.
बाबाच्या अनुपस्थितीत ज्या जागी हा बाबा बसत असे, त्याजागी या भक्तांनी पूजा अर्चा, प्रसाद ठेवला होता.
वेगवेगळ्या प्रकारची फळं,काकड्या, फरसाण असे अनेक पदार्थ प्रसाद म्हणून ठेवले होते.
बाबा वापरणाऱ्या वेगवेगळ्या टोप्या-पगाड्यांनी भरलेले एक मोठं कपाट मठात होतं. या कपाटात पंधराहून वेगवेगळ्या आकाराच्या पगड्या होत्या. बाबा जिथे बसतो त्याच्या मागील बाजूस देवारा आहे, तो कुलूप बंद आहे.
दरबार भरला की बाबा याच गाभाऱ्यातून नटून सजून बाहेर येत असे. पोलिसांनी या सगळ्यांची झाडाझडती घेतली.
संबंधित बातम्या
रत्नागिरीचा 'राम रहीम', पोलिसातून निवृत्त भोंदूच्या लीला