रत्नागिरी : दापोली पोलिसांनी विविध ठिकाणी छापेमारी करून 16 अनधिकृत बंदुका ताब्यात घेत्यानं खळबळ माजली आहे. गेल्या काही वर्षांपासून कार्यरत असलेल्या या बंदूक तस्करांच्या मुसक्या आवळण्याचं काम दापोली पोलिसांनी केलं आहे. या प्रकरणी 10 आरोपींना अटक करण्यात आली आहे.


दापोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवाजीनगर भौंजाळी येथील अमित मधुकर रहाटे (28) याने सिंगल नळीच्या 16 बंदुका विनापरवाना, न्हानू पेंडूरकर याच्याकडून खरेदी केल्या होत्या. त्या बंदुका त्याने विविध भागातील व्यक्तींना विकल्या होत्या. याचा संपूर्ण छडाच दापोली पोलिसांनी लावला आहे.


या बंदुका त्याने समीर मोगरे याला विकल्या होत्या. त्याने ती बंदूक गणेश चंद्रकांत चोरगे याला दोन वर्षापूर्वी विकली. तसेच सौरभ राजेंद्र म्हसकर याला 2 सिंगल बॅरलच्या बंदुका विकलेल्या होत्या. तसेच अभिषेक सुधाकर जाधव (रा.जालगाव, श्रीरामनगर,दापोली) याला 3 सिंगल बोअर बंदुका काही महिन्यांपूर्वी विकल्या होत्या. त्यानंतर त्याने 1 सिंगल बोअर बंदूक सौरभ सुरेश धवाली (रा.जालगाव ) याला शिकारीसाठी दिली. तर 1 सिंगल बोअर बंदूक आकाश रेळेकर (रा.दापोली बाजारपेठ) याला विक्री केलेली आहे. तसेच समीर सत्यवान मोगरे (रा. पोयनार, ता.खेड) याला काही महिन्यांपूर्वी एका सिंगल बोअर बंदूकीची विक्री केली होती. ती त्याने गणेश चंद्रकांत चोरगे (रा.नवशी, ता.दापोली) याला शिकारीसाठी दिलेली होती आणि तो त्यासाठी वापरत होता. तसेच 2 सिंगल बोअर बंदुका सुमीत बाळकृष्ण शिगवण (रा.मौजे दापोली) याला काही महिन्यांपूर्वी विक्री केल्या होत्या. त्यापैकी 1 सिंगल बोअर बंदूक विनोद बैकर याला शिकारासाठी आणि 1 सिंगल बोअरची 1 बंदूक मनिष भोसले (रा.साकुर्डे) याला विकल्या होत्या. तसेच आकाश रेळेकर (रा.दापोली बाजारपेठ) आणि आशिष मोहिते (रा.जालगाव) याला प्रत्येकी 1 सिंगल बोअर बंदूक विक्री केली होती. तसेच विजय नथुराम आंबेडे (रा.मौजे दापोली) याला 1 सिंगल बोअर बंदूक विक्री केली होती. त्याचबरोबर अनंत धोडू मोहिते (रा.कोळबांद्रे) याला 1 सिंगल बोअर बंदूक काही महिन्यापूर्वी विकली होती. ती त्याने त्याचे ओळखीचा प्रशांत प्रकार पवार (रा.माथेगुजर) याला शिकरीकरीता दिली होती. तसेच राजाराम ऊर्फ राजू काशिराम भुवड,(रा.गिम्हवणे) एका सिंगल बोअर बंदूकीची विक्री केली आहे. त्यापैकी 4 बंदुका पुन्हा अमित मधुकर रहाटे (वय 28 रा.शिवाजीनगर भौजाळी,ता.दापोली) याच्याकडे दिल्या होत्या. त्याने आपले घरात मोडतोड करुन सुट्टे भाग करून लाकडी बट जाळुन पुरावा नष्ट केलेला असल्याने वरील आरोपींमध्ये यांनी एकमेकाचे संगनमताने आणि सहाय्याने सदरच्या बंदूका या गैरकायदा असल्याचे माहीत असताना आपले जवळ बाळगले असल्याने पोलिसांनी गुन्हा दाखल केला.


गुन्ह्यातील आरोपी :


1. अमित मधुकर रहाटे 
राहणार भोगाळी दापोली 
2. सौरभ राजेंद्र म्हद्रसकर 
राहणार मौजे दापोली 
3. अभिषेक सुधाकर जाधव 
राहणार जालगाव 
4. सौरभ सुरेश घवाळी 
राहणार जालगाव लष्करवाडी 
5. विजय नथुराम आंबेडे 
राहणार मौजे दापोली 
6. नरेश केशव साळवी 
राहणार करंजाणी दापोली 
7. विश्वास वसंत कानसे 
राहणार मौजे दापोली 
8. निलेश विलास काताळकर 
राहणार खेडी दापोली 
9. प्रशांत प्रकाश पवार 
राहणार माथेगुजर 
10. अनंत धोंडु मोहिते 
राहणार कोळबांद्रे दापोली 


यांना दापोली पोलिसांनी अटक केली आहे.पोलीसांनी छापेमारी करून सर्व बंदूका जप्त केल्या आहेत.भारतीय हत्यार अधिनियम कलम 3/25 ( 3 ) अंतर्गत गुन्हा दाखल करून या प्रकरणी आणखी कोणा कोणाचा हाय आहे याचा पोलीस तपास करत आहेत.