1. ऑगस्ट ते डिसेंबर महिन्यात आठ प्रकारच्या लसींचे 216 कोटी डोस भारतात, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची माहिती
2. कोविशील्डच्या दोन डोसमधल अंतर तीन ते चार महिने असणार, अदर पुनावाला यांच्याकडून शिफारशीचं स्वागत
3. वर्ध्याच्या जेनेटिक लाईफ सायन्सेस कंपनीतून 17 हजार रेमडेसिवीरचा पहिला स्टॉक बाहेर, नितीन गडकरींच्या प्रयत्नांना यश
4. लातुरात कोरोनाच्या प्रादुर्भावात ऑक्सिजनचा तुटवडा, डॉक्टरांच्या अडचणीत वाढ; प्राणवायूसाठी वणवण
5. मराठा आरक्षणप्रश्नी केंद्र सरकारकडून फेरविचार याचिका दाखल, केंद्रकडून आरक्षणाचा चेंडू पुन्हा राज्याकडे ढकलण्याचा प्रयत्न
6. अरबी समुद्रात येत्या रविवारी चक्रीवादळाची स्थिती निर्माण होण्याची शक्यता, मुंबई, ठाण्याला यलो अलर्ट, तर रत्नागिरी, सिंधुदुर्गला सतर्कतेचा इशारा
7. पुण्यात भाजीविक्री करणाऱ्या आजीबाईंची कोरोनाग्रस्तांसाठी एक लाखांची मदत, नातवंडांच्या शिक्षणासाठी ठेवलेले पैसे कोरोनाबाधितांना
8. दुसरा विवाह केल्याने महिलेला थुंकी चाटण्याची शिक्षा देणाऱ्या दहा पंचांविरोधात गुन्हा दाखल, अकोल्यातील जात पंचायतीची विकृत शिक्षा
9. टाइम्स ग्रुपच्या चेअरपर्सन इंदू जैन यांचं निधन, वयाच्या 84 व्या वर्षी अखेरचा श्वास, पंतप्रधान आणि राष्ट्रपतींकडून शोक व्यक्त
10. कोरोनाच्या सावटात अक्षय्य तृतीया आणि ईदचा उत्साह, घरात राहून ईद साजरा करण्याचं मुस्लीम धर्मगुरुंचं आवाहन, तर निर्बंधांमुळे सराफा बाजार बंद