Ratan Tata : टाटा सन्सचे चेअरमन एमेरिटस रतन टाटा यांचे बुधवारी रात्री मुंबईतील रुग्णालयात निधन झाले. ते 86 वर्षांचे होते. 28 डिसेंबर 1937 रोजी नवल आणि सुनू टाटा यांच्या घरी जन्मलेले रतन हे टाटा समूहाचे संस्थापक जमशेदजी टाटा यांचे पणतू होते. रतन टाटा लहान असताना त्यांचे पालक वेगळे झाले आणि त्याचे संगोपन त्यांच्या आजीने केले. 1991 मध्ये त्यांनी टाटा समूहाची धूरा देण्यात आली. 


जगभरात टाटा समूहाची झेप


रतन टाटा हे पुस्तकप्रेमी होते. त्यांना यशोगाथा वाचनाची आवड होती. एका मुलाखतीत त्यांनी सांगितले होते की, निवृत्तीनंतर आता ते आपल्या छंदासाठी वेळ देत आहेत. 1991 ते 2012 पर्यंत गटाचे अध्यक्ष आणि ऑक्टोबर 2016 ते फेब्रुवारी 2017 पर्यंत हंगामी अध्यक्ष होते. रतन हे टाटा समूहाच्या चॅरिटेबल ट्रस्टचे प्रमुख होते. रतन टाटा यांनी आपला वारसा एका नव्या उंचीवर नेला. एअर इंडियाचा त्यांनी आपल्या साम्राज्यात समावेश केला. परदेशी कंपनी फोर्डने लँड्रोव्हर आणि जग्वार या लक्झरी कार ब्रँडचाही पोर्टफोलिओमध्ये समावेश केला आहे.टाटा समूहाची स्थापना जमशेदजी टाटा यांनी 1868 मध्ये केली होती.


टाटा कंपनी भारतातील सर्वात मोठी बहुराष्ट्रीय कंपनी आहे, तिच्या 30 कंपन्या जगातील 100 पेक्षा जास्त देशांमध्ये 10 वेगवेगळ्या व्यवसायांमध्ये व्यवसाय करतात. सध्या एन चंद्रशेखरन हे टाटा सन्सचे प्रमुख गुंतवणूकदार आणि टाटा कंपन्यांचे प्रवर्तक आहेत. टाटा सन्सचे 66 टक्के भाग भांडवल त्याच्या धर्मादाय ट्रस्टकडे आहेत. जे 2023-24 मध्ये टाटा समूहाच्या सर्व कंपन्यांचे एकूण उत्पन्न 13.86 लाख कोटी रुपये होते. यातून 10 लाखांहून अधिक लोकांना रोजगार मिळतो. त्यांची उत्पादने सकाळपासून संध्याकाळपर्यंत आपल्या जीवनात समाविष्ट आहेत. 


बंगालमधील नॅनो प्रकल्पाला प्रचंड विरोध


आयुष्यभर उद्योग जगतात ऋषितुल्य राहिलेल्या रतन टाटा यांना तीन प्रसंगामध्ये वाद ओढवला होता. देशातील मध्यमवर्गाला कारचे स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी धडपडत असतानाच बंगालमधील नॅनो प्रकल्पाला प्रचंड विरोध झाला होता. पश्चिम बंगालमधील सिंगूर येथे नॅनो कारच्या प्रकल्पाची घोषणा रतन टाटांनी मे 2006 मध्ये केली होती. त्यानंतर त्यांना तेथील शेतकऱ्यांच्या विरोधाला सामोरे जावे लागले. सरकारने सक्तीने जमिनी बाळकवण्याचे षड्यंत्र रचल्याचा आरोप झाला. जुलै 2006 मध्ये तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी याही सिंगूरमधील शेतकऱ्यांच्या बाजूने टाटांच्या प्रकल्प विरोधात रस्त्यावर उतरल्या. अखेर ऑगस्ट 2008 मध्ये रतन टाटांनी नॅनो कारचा प्रकल्प गुजरातमध्ये नेला. 


नीरा राडिया टेपमध्ये नाव आल्याने न्यायालयात धाव 


2010 मध्ये निरा राडिया ध्वनिफितचा वाद फारच गाजला होता. देशातील अनेक उद्योगपती, व्यावसायिक, राजकारणी सरकारी अधिकारी, पत्रकारांसाठी लॉबिंग करणाऱ्या राडिया आणि अशा अनेक व्यक्तींच्या संभाषणाच्या ध्वनिफीत उघड झाल्याने देशभरामध्ये एकच खळबळ उडाली होती. एका ध्वनिफितीमध्ये रतन टाटा आणि राडिया यांचे संभाषण होते आणि त्यावेळी टाटांनी न्यायालय धाव घेत त्या सार्वजनिक करण्यापासून रोखण्याची मागणी केली होती. 


सायरस मिस्त्री यांना पदावरून हटवले


वयाच्या 75व्या वर्षी रतन टाटा 28 डिसेंबर 2012 रोजी अध्यक्ष पदाच्या जबाबदारीतून मुक्त झाले होते. त्यांनी आपल्या जागी त्यांनी शापूरची पालनजी आणि समूहाचे सायरस मिस्त्री यांची नियुक्ती केली होती.  मात्र, काही कालावधीनंतर टाटा आणि मिस्त्री यांच्यातील संबंध नंतर ताणले गेले. यातूनच मिस्त्री यांना 24 ऑक्टोबर 2016 रोजी पदावरून हटवण्यात आले. त्यानंतर रतन टाटा अंतरिम अध्यक्ष झाले. 12 जानेवारी 2017 रोजी नटराजन चंद्रशेखरन यांची टाटा समूहाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.