बंदुकीचा धाक दाखवत महिलेवर बलात्कार, व्हिडीओ वायरल करण्याची धमकी
एबीपी माझा वेब टीम | 21 Dec 2018 07:43 PM (IST)
ही घटना 12 नोव्हेंबरच्या दुपारी साडे बारा ते साडे सहाच्या सुमारास एका हॉटेलमध्ये घडली. व्यवसायाशी संबंधित व्यक्तींना भेटायला म्हणून पीडित महिलेला किरणने त्या हॉटेलमध्ये बोलावले. मग तिथेच जबरदस्तीने जवळीक साधण्याचा प्रयत्न केला.
प्रातिनिधिक फोटो
पुणे : बंदुकीचा धाक दाखवून आयटी प्रोफेशनल असणाऱ्या महिलेवर बलात्कार झाल्याची घटना पिंपरी चिंचवडमध्ये समोर आली आहे. या प्रकरणी पीडित महिलेच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. पीडित महिलेने रियल इस्टेटचा व्यवसाय करणाऱ्या किरण भालेकरवर बलात्कार केल्याचा आरोप केला आहे. त्यानुसार वाकड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी किरणला अटक ही केली आहे. किरण हा पीडित महिलेच्या पतीचाच मित्र आहे. ही घटना 12 नोव्हेंबरच्या दुपारी साडे बारा ते साडे सहाच्या सुमारास एका हॉटेलमध्ये घडली. व्यवसायाशी संबंधित व्यक्तींना भेटायला म्हणून पीडित महिलेला किरणने त्या हॉटेलमध्ये बोलावले. मग तिथेच जबरदस्तीने जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. पीडित महिलेने विरोध केल्यानंतर त्याने महिलेला बंदुकीचा धाक दाखवत धमकावले आणि दोन वेळा बलात्कार केला. तसेच याचा व्हिडीओ देखील केला, असा आरोप पीडित महिलेने आरोपी किरणवर केले आहेत. तसेच घडला प्रकार कोणाला सांगितल्यास व्हिडीओ वायरल करण्याची आणि पतीला जीवे मारण्याची धमकी दिल्याचेही तक्रारीत नमूद केले आहे.