मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सुपुत्र अमित ठाकरे यांच्या लग्नाची पत्रिका सप्तशृंगी देवीचरणी ठेवली. पुढच्या वर्षी 27 जानेवारीला अमित ठाकरे विवाहबंधनात अडकणार आहेत.
देवाच्या चरणी पत्रिका ठेवून देवाला आमंत्रण दिल्यानंतर लग्नपत्रिका वाटण्याची परंपरा आहे. त्यानुसार राज ठाकरे यांनी नाशकात सप्तश्रृंगी देवीच्या चरणी पत्रिका ठेवली. राज ठाकरे यांच्या नाशिक दौऱ्याचा आजचा चौथा दिवस आहे.
रविवार, 27 जानेवारीला दुपारी 12 वाजून 51 मिनिटांनी अमित ठाकरेंच्या लग्नाचा मुहूर्त आहे. मुंबईतील लोअर परळ भागातल्या 'सेंट रेजिस'मध्ये हा विवाहसोहळा पार पडणार आहे.
अमित आणि मिताली यांची जुनी ओळख आहे. याच ओळखीचं रुपांतर प्रेमात झालं. 11 डिसेंबर 2017 रोजी राज ठाकरेंच्या लग्नाच्या वाढदिवसाचा मुहूर्त साधून अमित-मितालीचा साखरपुडा पार पडला होता. आता 27 जानेवारीला ते विवाहबंधनात अडकणार आहेत.
कोण आहे मिताली बोरुडे?
मिताली बोरुडे फॅशन डिझायनर आहे. फॅड इंटरनॅशनलमधून तिने फॅशन डिझायनिंगचं शिक्षण घेतलं आहे. प्रसिद्ध बेरिएट्रिक सर्जन - डॉ. संजय बोरुडे यांची ती कन्या. राज ठाकरेंची कन्या उर्वशी आणि मिताली चांगल्या मैत्रिणी आहे. काही वर्षांपूर्वी त्यांनी 'द रॅक' हा कपड्यांचा ब्रॅण्ड लॉन्च केला होता.
PHOTO | राज ठाकरेंकडून अमित यांच्या लग्नाची पत्रिका सप्तशृंगीचरणी
राज ठाकरेंकडून अमित यांच्या लग्नाची पत्रिका सप्तशृंगीचरणी
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
21 Dec 2018 02:00 PM (IST)
रविवार, 27 जानेवारीला दुपारी 12 वाजून 51 मिनिटांनी अमित ठाकरेंच्या लग्नाचा मुहूर्त आहे. मुंबईतील लोअर परळ भागातल्या 'सेंट रेजिस'मध्ये हा विवाहसोहळा पार पडणार आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -