सांगलीत शॉक देऊन तरुणीवर बलात्कार
एबीपी माझा वेब टीम | 20 Oct 2016 10:42 PM (IST)
सांगली: शॉक देऊन तरुणीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना तासगावमध्ये घडली आहे. याप्रकरणी मयूर पवार या आरोपीला अटक करण्यात आली आहे. मात्र धक्कादायक बाब म्हणजे मयूरवर बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्याचं ऐकून, त्याच्या भावाने गळफास घेऊन आयुष्य संपवलं. चैतन्य पवार असं आत्महत्या केलेल्या तरुणाचं नाव आहे. आरोपी मयूर आणि पीडित तरुणी हे गेल्या वर्षभरापासून डान्स क्लास चालवण्याच्या निमित्ताने एकत्र होते. मात्र मयूरने आज तिला शॉक देऊन बलात्कार केला. आपल्या भावाने हे पाशवी कृत्य केल्याचं समजताच चैतन्य पवारने गळफास घेऊन आत्महत्या केली. या धक्कादायक प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.