पाथर्डीत तरुणीला धमकावून वारंवार अत्याचार, सहाजणांवर गुन्हा दाखल
एबीपी माझा वेब टीम | 03 Mar 2017 04:03 PM (IST)
अहमदनगर: अहमदनगर मधील पाथर्डीमध्ये पुन्हा एकदा तरुणीवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पाथर्डी मधील जांभळी गावामध्ये नोव्हेंबर महिन्यात दत्तात्रय होडशीळ या नराधमानं पीडीतेला धमकावून अत्याचार केला. पीडित तरूणी प्रातर्विधीला गेल्यावर आरोपीनं तिला जबरदस्तीनं उचलून नेलं आणि परिवाराला जीवे मारण्याची धमकी देत तिच्यावर वारंवार अत्याचार केले. दरम्यान, पीडितेची गर्भधारणा झाल्यानं होडशीळचे सरपंच विजय आव्हाड आणि सहाजणांसोबत आरोपीनं पीडितेला गर्भपात करण्यास भाग पाडले. त्यानंतर हे प्रकरणी उघडकीस आले. या प्रकरणी पाथर्डी पोलीस ठाण्यात आरोपीसह सहाजणावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.