मतदानापूर्वी घरात लक्ष्मी येते, तीचा स्वीकार करा : रावसाहेब दानवे
कृष्णा केंडे, एबीपी माझा, औरंगाबाद | 17 Dec 2016 06:21 PM (IST)
औरंगाबाद : बेधडक वक्तव्यासाठी प्रसिद्ध असलेले भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी आणखी एक बेधडक आणि वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. मतदानापूर्वीचा दिवस अत्यंत महत्त्वाचा असतो. कारण त्या रात्री घरात लक्ष्मी येते. त्या लक्ष्मीचा स्वीकार करा असं वादग्रस्त वक्तव्य रावसाहेब दानवे यांनी केलं आहे. नगरपालिका निवडणुकांच्या तिसऱ्या टप्प्यासाठी पैठणमध्ये आज रावसाहेब दानवे आणि ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांची सभा झाली. त्यावेळी ते बोलत होते. यापूर्वी दानवेंनी डोंबिवलीत अशाच पद्धतीने वक्तव्य केलं होतं. ‘शहरात राहणारे मतदार शिवसेनेला मतदान करतात आणि परत गावाला जाऊन भाजपलाही मतदान करतात," असं दानवे म्हणाले होते.