जालना : पैठणमधील प्रचारसभेत पैशाचा उल्लेख केला नाही, देवाचं नाव घेणं हा आचारसंहितेचा भंग असू शकत नाही, असं स्पष्टीकरण भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंनी दिलं आहे. निवडणूक आयोगाने बजावलेल्या नोटिशीला दानवेंनी स्पष्टीकरण दिलं.


लक्ष्मीचं दर्शन घ्या याचा अर्थ पैसे घ्या असा होत नाही, मी पैशाचा कुठेही उल्लेख केलेला नाही, देवाचं नाव घेतल्याने आचारसंहितेचा कुठेही भंग होऊ शकत नाही, असं स्पष्टीकरण दानवेंनी दिलं. निवडणूक आयोगाने दानवेंना बजावलेल्या नोटिशीला जालन्यात उत्तर दिलं. निवडणूक आयोग योग्य ती कारवाई करेल, असंही दानवे म्हणाले.

'मतदानापूर्वीचा दिवस अत्यंत महत्त्वाचा असतो. कारण त्या रात्री घरात लक्ष्मी येते. त्या लक्ष्मीचा स्वीकार करा' असं वक्तव्य रावसाहेब दानवे यांनी केलं होतं. नगरपालिका निवडणुकांच्या तिसऱ्या टप्प्यासाठी पैठणमध्ये रावसाहेब दानवे आणि ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांची सभा झाली. त्यावेळी दानवे बोलत होते.

यापूर्वी दानवेंनी डोंबिवलीत अशाच पद्धतीने वक्तव्य केलं होतं. 'शहरात राहणारे मतदार शिवसेनेला मतदान करतात आणि परत गावाला जाऊन भाजपलाही मतदान करतात' असं दानवे म्हणाले होते.

पाहा व्हिडिओ :


संबंधित बातम्या :


रावसाहेब दानवेंना निवडणूक आयोगाची नोटीस