जालना : भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि त्यांचे पुत्र आमदार संतोष दानवे हे एकाच वेळी घोड्यावर बसल्याचं दृश्य पाहायला मिळालं. जालन्यात काल (18 नोव्हेंबर) एका गावातील रस्त्याच्या भूमीपूजनानंतर दानवे पिता-पुत्रांची घोड्यावरुन मिरवणूक काढण्यात आली. यावेळी दोघांनी घोड्यावरुन रपेट केली.


जालना जिल्ह्यातील जाफराबाद तालुक्यातल्या आडा या गावातील रस्त्याचं रावसाहेब दानवे आणि संतोष दानवे यांच्या हस्ते भूमीपूजन करण्यात आलं. या भूमीपूजनानंतर भाजप कार्यकर्त्यांनी दानवे पिता-पुत्रांना घोड्यावर बसवलं आणि त्यांची वाजतगाजत मिरवणूक काढली.


यावेळी गावातील सरपंचासह ग्रामपंचायतीच्या सगळ्या सदस्यांचा भाजपमध्ये प्रवेश झाला.