मुंबई : नागपूरच्या मध्यवर्ती कारगृहात जागतिक योग दिनी योगासने करणे कैद्यांना फायद्याचे झाले आहे. कारण योग दिनानिमित्त घेण्यात आलेल्या परिक्षेत उत्तीर्ण झालेल्या तब्बल १७७ कैद्यांची शिक्षा माफ करण्यात आली आहे.
आधिक माहितीनुसार, मे महिन्यात नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहामध्ये रामदेवबाबांच्या पतंजली योगपीठाकडून योगासंदर्भात परिक्षा घेण्यात आली होती. या परिक्षेत १९० कैद्यांनी सहभाग घेतला होता. त्यातील १७७ कैद्यांनी ही परिक्षा उत्तीर्ण केली होती.
यासंदर्भात मध्यवर्ती कारागृहाचे उपमहानिरिक्षक योगेश देसाई यांनी सांगितले की, ''या परिक्षेसाठी १९० कैदी बसले होते. त्यापैकी १७७ जण या परिक्षेत उत्तीर्ण झाले. त्यामुळे या उत्तीर्ण कैद्यांची तीन महिन्यांची शिक्षा माफ करण्यात आली आहे.''
२१ जून रोजी नागपूर मध्यवर्ती कारागृहात सामुहिक योग कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले होते.