Ramdas Athawale on Raj Thackeray : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे उतरवण्यासाठी अल्टिमेटम दिल्यानंतर त्याचे राजकीय पडसाद उमटत आहेत. केंद्रीय राज्यमंत्री आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आठवले गट) नेते रामदास आठवले यांनी राज यांना सल्ला दिला आहे. तुम्हाला कुठे भोंगे लावायचे ते लावा मात्र कुठे इतर ठिकाणीच भोंगे काढा ही भूमिका योग्य नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. अशा पक्षांना आमचा विरोध असल्याचे आठवले यांनी म्हटले. अलीकडे राज यांचा तोल गेला असल्याचे आठवले यांनी म्हटले. आठवले हे लातूर दौऱ्यावर आहेत. त्यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी आपले मत व्यक्त केले.  


मंगळवारी झालेल्या सभेतही राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे काढण्यासाठी ईदपर्यंतचा अल्टिमेटम दिला आहे. मशिदीवरील बेकायदेशीर भोंगे न काढल्यास मंदिरात लाऊडस्पीकरून हनुमान चालीसा लावण्याचे आदेश कार्यकर्त्यांना दिले. त्यावर आठवले यांनी नाराजी व्यक्त केली. राज ठाकरे यांनी धमकी देता कामा नये असेही आठवले यांनी म्हटले. मनसेच्या झेंड्यात सगळे रंग होते. मात्र त्याच्या मागे कोणी गेले नसल्याचे त्यांनी म्हटले. भगवा रंग शांततेचे प्रतीक आहे त्यामुळे त्याचा गैरवापर करू नका असे आवाहनही आठवले यांनी केले. मंदिरात लाऊडस्पीकर लावा. मात्र, मशिदीवरील भोंगे काढा ही मागणी क्रूर असल्याचे आठवले यांनी सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे शिवाजी महाराज यांना मानतात. त्यांची वैचारीक भूमिका ही शाहू-फुले-आंबेडकर यांच्याशी जोडणारी असल्याचेही आठवले यांनी सांगितले. 


रिपाइं गटांनी एकत्र यावं, प्रकाश आंबेडकरांनी पुढाकार घ्यावा


रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे सर्व गट झाले पाहिजे. रिपाइं गटांची एकजूट, एकत्रिकरण प्रकाश आंबेडकर यांच्याशिवाय शक्य नसल्याचे आठवले यांनी सांगितले.  प्रकाश आंबेडकर रिपाइं गटाच्या एकत्रिकरणासाठी तयार नसतील तर लोकांनी माझ्यासोबत यावं असे आठवले यांनी सांगितले. रिपाइं गट एकत्र  आल्याने सन 1995 आणि 1998 ला काही प्रमाणात यश आले होते. प्रकाश आंबेडकरसोबत आले आणि भाजपसोबत गेलो तर पक्ष आणखी मजबूत होईल असे आठवले यांनी म्हटले. मी एकटा होतो, पण मंत्री झालो. आम्ही सगळं एक झालो तर मंत्र्यांची संख्या वाढली असती.  'मी जिकडे, तिकडे सत्ता' हे समीकरण असल्याचेही आठवले यांनी सांगितले. 


इतर महत्त्वाच्या बातम्या: