Rajya Sabha Election 2024 : महाविकास आघाडीला राज्यसभेसाठी (Rajya Sabha Election 2024) भाजप एकही जागा देणार नाही, अशी चर्चा रंगली असतानाच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी राज्यसभेची निवडणुक बिनविरोध होणार असल्याची घोषणा केली आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. सर्वांकडे पुरेसा कोटा असल्याने चुरस निर्माण करण्यात तथ्य नसल्याचे ते म्हणाले.
चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, भाजपकडून राज्यसभेसाठी तीन उमेदवार आज जाहीर केले आहेत. काल अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांचा पक्ष प्रवेश भाजपमध्ये झाला. पक्षाने त्यांचा सन्मान करत त्यांना राज्य सभेची उमेदवारी जाहीर केली आहे. आमचे वैद्यकीय सेल आहे. लिंगायत समाजात त्यांचे सामाजिक कार्य आहे असे अजित गोपछडे यांना उमेदवारी दिली आहे. मेधा कुलकर्णी या पक्षाच्या सदस्य असून त्यांना उमेदवारी दिली. ही निवडणूक बिन विरोध दिसत असून काँग्रेसकडून उमेदवारी मिळालेल्या चंद्रकांत हंडोरे यांचेही मी अभिनंदन करतो.
अशोक चव्हाण यांचा सन्मान केला गेला पाहिजे
त्यांनी पुढे सांगितले की, आमचे खासदार येतील ते महाराष्ट्रासाठी काम करतील. अशोक चव्हाण यांचा सन्मान केला गेला पाहिजे. विकसित भारताचा संकल्प केला आहे. अशोक चव्हाण यांना उमेदवारी दिली कारण सन्मानपूर्वक वागणूक देणे हे पक्षाचे संस्कार आहेत.
उद्धव ठाकरेंवर तोफ डागली
बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिले. उद्धव ठाकरे यांच्या स्वप्नात देवेंद्र फडणवीस येतात. ते जेवढी नाव कुटूंबाची घेत नाहीत, तेवढं नाव देवेंद्र फडणवीस यांचं घेतात. उद्धव ठाकरे व्यथित मानसिकतेत गेले आहेत. जनसंवाद यात्रा नसून ती हास्यजत्रा झाली आहे. दुःखाचे खापर ते दुसऱ्याला फोडत आहेत. देवेंद्र फडणवीस यांचे ते नाव जप करत आहेत, असे ते म्हणाले.
नाना पटोले यांनी स्टंटबाजी करून भाजप सोडली
बावनकुळे नाना पटोले यांना बोलण्याचा अधिकार नसल्याचे ते म्हणाले. पटोले भाजपचे खासदार राहिले आहेत. नाना पटोले यांनी काँग्रेसने कसा देश बुडवला आहे असे म्हटलेले व्हिडिओ मी काढणार आहे. नाना पटोले यांनी स्टंटबाजी करून भाजप सोडली. काँग्रेस किती वाईट आहे हे नाना पटोले अनेक वेळा म्हणाले आहेत.
मराठा आरक्षणावर बावनकुळे काय म्हणाले?
सरकार विशेष अधिवेशन घेऊन तोडगा काढण्याच्या मानसिकतेमध्ये आहे. सरकारची जी भूमिका आहे ती जरांगे यांनी समजून घेतली पाहिजे, 20 तारीखला चार दिवस राहिले आहेत. जरांगे यांनी जी भूमिका घेतली त्यात राजकीय येऊ नये.
इतर महत्वाच्या बातम्या