नाशकात सुकाणू समितीच्या बैठकीत आगंतुक महिलेचा गोंधळ
एबीपी माझा वेब टीम | 08 Jun 2017 02:49 PM (IST)
नाशिक : राज्यभरात सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी नाशकात सुकाणू समितीची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत एका आगंतुक महिलेने घोषणाबाजी सुरु केल्याने गोंधळ उडाला. कल्पना इनामदार असं सुकाणू समितीच्या व्यासपीठावर गोंधळ घालणाऱ्या महिलेचं नाव आहे. इनामदार या मुंबईतल्या सामाजिक कार्यकर्त्या आहेत. सुकाणू समितीची बैठक सुरु होताच त्यांनी स्टेजवर चढून घोषणाबाजी सुरु केल्याने गोंधळाचं वातावरण निर्माण झालं. सुकाणू समितीतून सर्व राजकीय नेत्यांना काढा आणि सामान्य शेतकऱ्यांना घ्या, किंवा काँग्रेससोबतच राष्ट्रवादी, भाजप, शिवसेना, मनसे अशा सर्व पक्षांच्या नेत्यांचा समितीत सहभाग घ्या, अशी मागणी त्यांनी केली. त्याचप्रमाणे, अजित नवले यांनी पुणतांबावासी आणि प्रसारमाध्यमं यांना न सांगता मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याबाबतही इनामदार यांनी आक्षेप नोंदवला. पाहा व्हिडिओ :