Raju Shetti on  Devendra Fadnavis : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सर्वात मोठे ब्लॅकमेलर असल्याची टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांनी केली आहे. गेल्या सहा दिवसापासून पंढरपूर तालुक्यातील वाखरी इथं ऊस दरासाठी सुरु असलेले आमरण उपोषण राजू शेट्टी आणि रविकांत तुपकर यांच्या उपस्थितीत सुटले. यानतर बोलताना राजू शेट्टींनी सरकारवर टीका केली.  मुख्यमंत्री सहाय्यता निधीला 15 रुपये द्या नाहीतर काटामारी बाहेर काढू असे म्हणणारे मुख्यमंत्री हेच सर्वात मोठे ब्लॅकमेलर असल्याचे शेट्टी म्हणाले.

Continues below advertisement

कोल्हापूर सातारा आणि सोलापूर या जिल्ह्यातील 51 साखर कारखान्यांनी 3000 पेक्षा जास्त पहिली उचल केली जाहीर 

ऊसाला पहिली उचल साडेतीन हजार रुपये मिळावी यासाठी गेल्या सहा दिवसापासून समाधान फाटे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी वाखरी येते आमरण उपोषण सुरू केले होते. आज जिल्ह्यातील 15 पेक्षा जास्त साखर कारखान्यांनी पहिली उचल तीन हजार रुपये देण्याचे जाहीर केल्यानंतर राजू शेट्टी आणि रविकांत तुपकर यांनी आंदोलकांना लिंबू पाणी देत त्यांचे आमरण उपोषण सोडवले. यावेळी बोलताना राजू शेट्टी यांनी मुख्यमंत्री आणि सरकारवर सडकून टीका केली. गेले सहा दिवसापासून आमरण उपोषण सुरू असूनही सरकारला याकडे लक्ष देण्यास वेळ नसल्याची टीका केली. स्वाभिमानीच्या आंदोलनामुळे कोल्हापूर सातारा आणि सोलापूर या जिल्ह्यातील जवळपास 51 साखर कारखान्यांनी 3000 पेक्षा जास्त पहिली उचल मिळू शकली. एका बाजूला सरकार न्यायालयात एफ आर पी चे तुकडे पाडण्यासाठी प्रयत्न करीत असताना स्वाभिमानीमुळे मात्र 51 साखर कारखान्यांनी पहिली उचल 3000 पेक्षा जास्त देण्यास भाग पाडल्याने हा खरा तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा विजय असल्याचे शेट्टी यांनी सांगितले. 

3 हजार भाव दिला नाही त्या कारखान्यातील गव्हाणीत उड्या मारुन कारखाने बंद करायचे आंदोलन सुरुच राहणार

सोलापूर जिल्ह्यात ज्या साखर कारखान्यांनी अजून 3 हजार भाव दिला नाही त्या ठिकाणी गव्हाणीत उड्या मारून कारखाने बंद करायचे आंदोलन सुरूच राहणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले. एका बाजूला साखर कारखानदार सरकारला हाताशी धरून एफ आर पी चे तुकडे पाडण्यासाठी न्यायालयात प्रयत्न करीत असताना स्वाभिमानीने शेतकऱ्यांना पहिली उचल म्हणून एफआरपी पेक्षा जास्त रक्कम मिळवून दिली असून हा सरकार व कारखानदारांचा पराभव असल्याचा टोलाही शेट्टी यांनी लगावला आहे. 

Continues below advertisement

महत्वाच्या बातम्या:

Solapur farmers protest: सोलापूर जिल्ह्यात ऊस आंदोलनाचा भडका; राज्यातील शेतकरी नेते निघाले पंढरपूरकडे; आंदोलनानंतर कारखानदार आले गुडघ्यावर