Ajit Pawar: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचे पुत्र पार्थ पवार (Parth Pawar) यांच्या ‘अमेडिया’ कंपनीच्या कोरेगाव पार्क (मुंढवा) येथील 40 एकर जमीन विक्री प्रकरणात प्रमुख अधिकारपत्रधारक (कुलमुखत्यारधार) शीतल तेजवानीला (Sheetal Tejwani) पुणे पोलिसांच्या (Pune Police) आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली. या प्रकरणात पार्थ पवार यांच्यावर अद्याप कोणतीही कारवाई झालेली नसल्याने विरोधकांनी अजित पवारांवर हल्लाबोल केला आहे. आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यातील जमीन व्यवहार प्रकरणाबाबत एक मोठं वक्तव्य केले आहे. या प्रकरणी व्यवहार होत असताना अधिकाऱ्यांनी कागदपत्र पडताळणी करणे आणि चुकीच्या बाबी असल्याचे लक्षात आल्यानंतर भूमिका घेणे अपेक्षित होते. अधिकाऱ्यांकडून कारवाई झाली असती तर पुढील प्रकार घडला नसता, असे अजित पवारांनी अनौपचारिक चर्चेत म्हटले आहे. त्यामुळे पुण्यातील जमीन व्यवहार प्रकरणाचे खापर अजित पवार यांनी अधिकाऱ्यांवर फोडल्याचे दिसून आले, अजित पवारांच्या या वक्तव्यावरती सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी संताप व्यक्त केला आहे.

Continues below advertisement

Anjali Damania on ajit Pawar: पार्थ पवार काही कुकूला बाळ नाहीत

अंजली दमानियांनी म्हटलंय की, मला असं वाटतं की लहान मुलं जेव्हा शाळेत जातात, जेव्हा ती कुकूला बाळ असतात, तेव्हा ते मारामारी करतात, तेव्हा असं वाटतं की टीचरने त्यांना थांबवायला हवं होतं, मारामाऱ्या होऊ द्यायला नको होत्या. तसंच काहीस विधान मला अजित पवारांचं वाटत आहे. त्यांचा पार्थ पवार काही कुकूला बाळ नाही आणि त्यांनी जे केली ती चूक नाही, हे फ्रॉड आहे, त्यांनी एकदा नाही तर सगळे डॉक्युमेंट बदलून जे पहिल्यांदा सप्लीमेंट एलएलपी बनवलं, रेसुलेशन (Resolution)पास केलं, खोटा एलओआय घेतला, त्यानंतर एडजुडिकेशन (Adjudication) केलं, सेल डिल केलं आणि त्यानंतर पझेशन पर्यंत जर ह्या व्यक्तीने सगळं केलं असेल तर ही काही छोटी मोठी चूक नाही हे फ्रॉड आहे, आणि तो पूर्ण मोठा झालेला तुमचा मुलगा आहे, त्यामुळे याच्यात अधिकाऱ्यांची चूक नाही जर त्यांना मुलाची चूक दिसत नसेल, तर त्याची दृष्ट काढा आणि त्याला घरात बसवा आम्हाला जे लढायचं आहे ते आम्ही लढणार आहोतच असंही अंजली दमानिया यांनी पुढे म्हटलं आहे

Ajit Pawar: नेमकं काय म्हणाले अजित पवार? 

मुंढवा जमीन प्रकरणी व्यवहार होत असताना अधिकाऱ्यांनी कागदपत्र पडताळणी करणे आणि चुकीच्या बाबी असल्याचे लक्षात आल्यानंतर भूमिका घेणे अपेक्षित होते. अधिकाऱ्यांकडून कारवाई झाली असती तर पुढील प्रकार घडला नसता, असे अजित पवारांनी अनौपचारिक चर्चेत म्हटले आहे. त्यामुळे पुण्यातील जमीन व्यवहार प्रकरणाचे खापर अजित पवार यांनी अधिकाऱ्यांवर फोडल्याचे दिसून येत आहे.

Continues below advertisement