Raju Shetti : राजकारणाचा खेळ खंडोबा झाला आहे. सर्वसामान्यांच्या मूलभूत प्रश्नांकडे सर्वांचं दुर्लक्ष होत आहे. त्यामुळं या सर्वांना आता कात्रजचा घाट दाखवण्याची वेळ आली असल्याचे वक्तव्य स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी केलं आहे. लोकांच्या समस्या सोडविण्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या सरकार आपल्या दारी कार्यक्रमांत थेट घुसण्याचा इशाराही राजू शेट्टींनी यावेळी दिली. ते जळगावमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते. 


सर्वसामान्यांकडेमूलभूत प्रश्नाकडे सरकारचे दुर्लक्ष 


सध्या राज्यात पक्षांची फोडाफोडी सुरु आहे. राजकारणाचा खेळखंडोबा सुरु आहे. त्यामुळं सर्वसामान्यांकडे त्यांच्या मूलभूत प्रश्नाकडे सर्वांचे दुर्लक्ष होत असल्याचे राजू शेट्टी म्हणाले. त्यामुळं सर्व सामान्य मतदार जनतेने विचार करावा. या सर्वांना आता कात्रजचा घाट दाखविण्याची वेळ आली असल्याचे मत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी व्यक्त केलं. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी हे जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. यादरम्यान मुक्ताईनगर येथे त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते.  


आठ दिवसांच्या आत नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना मदत न मिळाल्यास...राजू शेट्टींचा इशारा


शेतकर्‍यांच्या प्रश्नांकडे सरकारचे दुर्लक्ष असल्याचे राजू शेट्टी म्हणाले. अतिवृष्टीमुळं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तात्काळ मदत द्या, अन्यथा पुढच्या शासन आपल्या दारी या कार्यक्रमात घुसू असा इशारा राजू शेट्टींनी दिला. शेतकर्‍यांच्या मूलभूत प्रश्‍नांकडे सत्ताधार्‍यांसह विरोधकांचेही दुर्लक्ष झाल्याचे राजू शेट्टी म्हणाले. आठ दिवसांच्या आत नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना मदत न मिळाल्यास आपण शासन आपल्या दारी कार्यक्रमात थेट शिरुन मुख्यमंत्र्यांना जाब विचारणार असल्याचे राजू शेट्टी म्हणाले.


जमीन खरडून गेलेल्या शेतकऱ्यांना एकरी एक लाख रुपयांची मदत द्यावी


कालच राजू शेट्टींच्या नेतृत्वाखाली बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तहसील कार्यालयावर पूरग्रस्त शेतकऱ्यांचा भव्य मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी संग्रामपूर , जळगाव जामोदसह परिसरातील तालुक्यामध्ये ढगफुटीमुळे आलेल्या पुरामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या परिसरातून शेकडो जनावरे पुरात वाहून गेले आहेत. हजारो एकर शेतजमीन खरवडून गेली असून पिके वाहून गेल्याने  शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शासनाने तातडीने पंचनामे करुन जमीन खरडून गेलेल्या शेतकऱ्यांना एकरी एक लाख आणि पिकासाठी एकरी 50 हजार रुपयांची नुकसान भरपाई देण्याची मागणी करण्यात आली आहे.


महत्त्वाच्या बातम्या:


हिंगोली जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी 412 मिमी पावसाची नोंद; शेकडो हेक्टरला नुकसानीचा फटका