Raju Shetti : देवेंद्र फडणवीस ज्यावेळी 10 वर्षापूर्वी पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले होते, त्यावेळी मी साखर कारखाने काटा कसे मारतात याचे पुरावे दिले होते. कारखाने कसे विकतात? याचे पुरावे दिले होते. पण त्यांनी सगळे पुरावे किरीट सोमय्यांना दिल्याचे मत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमु राजू शेट्टी (Raju Shetti )यांनी व्यक्त केले. त्यानंतर त्यांनी सर्व साखर कारखानदारांनाच भाजपमध्ये घेतल्याचे शेट्टी म्हणाले. सगळे पुरावे आपल्याच खिशात ठेवले. आता मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी कारखाने पैसे देत नाहीत म्हणाले त्यावेळी फडणवीस म्हणतात की, ते पुरावे आता बाहेर काढू काय असे म्हणत शेट्टींनी फडणवीसांवर टीका केली. म्हणजे महाराष्ट्राचा मुख्यमंत्री काय ब्लॅकमेलर आहे काय? असेही शेट्टी म्हणाले. राजू शेट्टी हे आज जयसिंगपूरमध्ये आयोजित केलेल्या 24 व्या ऊस परिषदेत बोलत होते. 

Continues below advertisement

काटा मारी थांबवा, गेल्या 10 वर्षापासून आम्ही बोंबलत असल्याचे शेट्टी म्हणाले. पाच हजाराने चालणारा कारखाना जर 10 टक्क्यांनी काटा मारायला लागला तर दररोज 500 टन काटा मारला जातो. 500 टनाचे 3 हजार धरले तर दररोज साखर कारखाने 15 लाख रुपये काळा पैसा कारखानदारांच्या खिशात जात असल्याचे शेट्टी म्हणाले. एका कारखान्यात एका दिवशी 15 लाख रुपये काळा पैसा कारखानदारांकडे जात असल्याचे शेट्टी म्हणाले. 

काटा मारीतून एका वर्षाला नवीन एक साखर कारखाना तयार होऊ शकतो

काटा मारीतून एका वर्षाला नवीन एक साखर कारखाना तयार होऊ शकतो असे शेट्टी म्हणाले. इतक्या मोठ्या प्रमाणात काटामारी केली जाते. पेट्रोल पंपावर काटा मारला तर लगेच सॉफ्टवेअरने कळतं, तशीच यंत्रणा तयार केली तर काटामारी सहज रोखू शकतात असे शेट्टी म्हणाले. मग देवाभाऊ तुमचा हात कुणी धरला आहे? असा सवाल शेट्टींनी केला. कोल्हापूरमध्ये गेल्या अनेक वर्षे काटामारी रोखणारी यंत्रणा धूळखात पडली आहे. स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांना सांगतो ती यंत्रणा भंगारात काढून टाका. उसाला यावेळी तुरे येणार आहेत. ऊस तोडायला पैसे देऊ नका, 20 जानेवारीच्या आत हंगाम संपणार आहे. त्यामुळं ऊस घालवायला गडबड करू नका, घरात शोधत येणार आहेत तुमचा ऊस तोडायचा का म्हणून. आम्ही ऊस तोड मजुरांच्या पैसे वाढीला विरोध केला आहे का? उलट आम्ही पाठींबा दिला आहे. तर मग ऊस तोडणाऱ्यांना पैसे द्यायची काय गरज आहे असे शेट्टी यावेळी म्हणाले. 

Continues below advertisement

महत्वाच्या बातम्या:

Raju Shetti on Devendra Fadnavis: काटा मारणारे व रिकव्हरी चोरणारे सोबत घेऊन फिरत आहात, तुमच्या पक्षाच्या पोलादी पुरुष समजल्या जाणाऱ्या अमित शाहांमध्येही कारवाईची धमक नाही; राजू शेट्टींचा घणाघाती प्रहार