Hingoli : काही दिवसांवरच दिवाळीचा सण आला आहे. या दिवाळी सणाची सध्या धामधूम सुरु झाली आहे. या दिवाळीच्या तोंडावर अनेक नागरिक मोठ्या प्रमाणामध्ये खरेदी करतात. यामध्ये अनेकजण ऑनलाईन ॲपमधून खरेदी करताना पाहायला मिळत आहे. मात्र, हिंगोली जिल्ह्यात अमेझॉनवरुन ऑनलाईन खरेदी करणं महागात पडलं आहे. एका ग्राहकाने ऑनलाईन एसी मागवला होता, मात्र, त्यामध्ये एसी आलाच नाही, त्याऐवजी कचरा आणि लाकडाचे तुकडे पार्सलमध्ये मिळाले.  

Continues below advertisement

पार्सलमध्ये मात्र एसीऐवजी चक्क लाकडाचे तुकडे पुठ्ठा टाकाऊ कचरा

दिवाळीच्या काळामध्ये ग्राहक मोठ्या प्रमाणामध्ये ऑनलाइन खरेदी करत असतात. ही खरेदी करत असताना वेगवेगळ्या ॲप्लिकेशनचा वापर केला जातो. हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी शहरात राहणाऱ्या  राजू कांबळे यांनी अमेझॉन या प्रमुख समजल्या जाणाऱ्या शॉपिंग अॅपवरुन एसी ची खरेदी केली होती.  खरेदी केल्यानंतर लगेच ऑनलाईन पद्धतीने त्यांनी एसीचे पैसे सुद्धा दिले. त्यानंतर आज एसीचे पार्सल घेऊन अमेझॉन कंपनीचा कुरिअर बॉय राजू कांबळे यांच्याकडे आला. यावेळी कांबळे यांनी  पार्सल स्वीकारले. आपण केलेली खरेदी राजू कांबळे अगदी कुतूहलाने उघडून बघत होते, दरम्यान त्या पार्सलमध्ये मात्र एसीऐवजी चक्क लाकडाचे तुकडे पुठ्ठा टाकाऊ कचरा  निघाला आहे. अमेझॉनवर या दिवाळी काळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये खरेदीसाठी ऑफर दिल्या जातात. या खरेदीला बळी पडून अशा पद्धतीने ग्राहकाची फसवणूक होत आहे. त्यामुळं खरेदी करत असताना ग्राहकांनी सतर्क राहणं गरजेचं आहे.

महत्वाच्या बातम्या :

Continues below advertisement

Amazon India : अमेझॉन इंडियामध्ये 1.5 लाख नोकऱ्यांची संधी, सणासुदीच्या काळात मागणी वाढल्याने निर्णय