मुंबई: नरेंद्र मोदींसारखा पंतप्रधान देशाला मिळावा अशी मागणी मी पहिल्यांदा केली होती. आता त्यांनी दोन मागण्या पूर्ण कराव्यात. समान नागरी कायदा आणि देशातील लोकसंख्या नियंत्रण आणणारा कायदा करा अशी मागणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली आहे. ते ठाण्यातील 'उत्तर' सभेत बोलत होते.


गुढी पाडव्याच्या सभेनंतर अनेकांना जे तारे तोडले त्यांना उत्तर म्हणून ही सभा आहे असं राज ठाकरे म्हणाले. ईडीने नोटीस दिली म्हणून ट्रॅक बदलला हा गैरसमज. मला कोणतीही नोटीस येवो, अशा नोटिसींनी मी भीक घालत नाही.


गुढी पाडव्याच्या सभेनंतर अनेकांना जे तारे तोडले त्यांना उत्तर म्हणून ही सभा आहे असं राज ठाकरे म्हणाले.


माझ्या ताफ्याला काही जण अडवणार आहेत हे गुप्तचर विभागाला समजलं, पण पवारांच्या घरावर एसटी कर्मचारी आंदोलन करणार आहेत हे समजलं नाही असा टोलाही राज ठाकरेंनी लगावला आहे. आजची ही सभा मोठे स्क्रीन लावून अनेक राज्यांमध्ये दाखवली जात आहे.


मशिदींच्या भोंग्यासंबंधी सर्व मशिदींना 3 मे पर्यंत मुदत देतो, या नंतर जर कोणी भोंगे काढले नाहीत तर देशभर मशिदींसमोर हनुमान चालीसा लावण्यात येणार असा इशारा मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी दिला आहे. 


मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यात मशिदीवरील भोंग्याबाबत घेतलेल्या  भूमिकेचे राज्याच्या राजकारणावर उमटलेले पडसाद अजूनही विरलेले नाहीत. त्याच पार्श्वभूमीवर अवघ्या दहा दिवसांत राज ठाकरे यांची ठाण्यात आज दुसरी सभा होत आहे. 


मनसेनं या सभेला उत्तर सभा असं म्हटलंय. या सभेचा दुसरा टीझर मनसेकडून सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे एखादी सभा घेऊन बोलतात आणि गायब होतात असे विधानं शरद पवार यांनी करत मनसेच्या थेट वर्मावर बोट ठेवलं होतं. 


महत्त्वाच्या बातम्या: