मनसेनं हिंदुत्वाच्या मुद्द्यावर वाटचाल सूरू केल्याने भाजपशी जवळीक वाढल्याच्या चर्चा सध्या राजकीय वर्तुळात आहे. नुकतीच राज ठाकरे-देवेंद्र फडणवीस यांची गुप्त झाली. राज ठाकरे यांनी मुंबईतील कृष्णकुंज या निवासस्थानी मनसे पदाधिकारी आणि विभाग अध्यक्षांची महत्वाची बैठक बोलावली होती. बैठकीत राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना न भूतो, न भविष्यती असा मोर्चा काढण्याच्या सूचना दिल्या आहेत.
MNS supporting NRC | एनआरसी समर्थनाच्या मोर्च्यासाठी मनसेची तयारी, 9 फेब्रुवारीला होणार आंदोलन
बांगलादेशी आणि पाकिस्तानी घुसखोरांना देशाबाहेर हाकला या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून 9 फेब्रुवारीला मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चाला परवानगी मागण्यासाठी मनसे पदाधिकाऱ्यांनी थोड्या वेळापूर्वी पोलिस आयुक्तालयात पोलिसांची भेट घेतली. न भूतो न भविष्यती असा मोर्चा निघाला पाहिजे, अशी सूचना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत. दरम्यान, आपल्याला हिंदूहृदयसम्राट म्हणू नका, मोर्चावेळी झेंड्यावरील राजमुद्रेचा अवमान करु नका, अशा सूचना राज ठाकरेंनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना केल्या.
मनसेच्या पहिल्या महाअधिवेशनात बोलाताना राज ठाकरे यांनी म्हटलं होतं की, देशातील घुसखोरांना हुसकावून लावण्यास केंद्र सरकारला माझा पूर्ण पाठिंबा आहे. नागरिकत्व दुरुस्ती कायदा आणि एनआरसी विरोधात जे मोर्चे काढले जात आहेत, तो संशोधनाचा विषय आहे. मात्र मोर्चांना मोर्चानेच उत्तर दिलं पाहिजे. त्यासाठी 9 फेब्रुवारी रोजी आझाद मैदानावर मोर्चा काढण्याची घोषणा राज ठाकरे यांनी केली होती.