पुणे : ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या, लेखिका आणि संपादक विद्या बाळ यांचं निधन झालं. त्या 84 वर्षांच्या होत्या. विद्या बाळ या गेल्या अनेक दिवसांपासून आजारी होत्या. उपचारादरम्यान त्यांनी पुण्यातील खासगी रुग्णालयात गुरूवारी (30 जानेवारी) सकाळी अखेरचा श्वास घेतला. महिलांच्या पुरुषांबरोबरच्या समान हक्कांसाठी झटणाऱ्या कार्यकर्त्या अशी विद्या बाळ यांची ओळख होती. विद्या बाळ यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी प्रभात रोड येथील 'नचिकेत' या निवासस्थानी ठेवण्यात येणार आहे. सायंकाळी साडेपाच वाजता त्यांच्यावर वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. महाराष्ट्रातील अनेक सामाजिक आंदोलनांमध्ये विद्या बाळ सक्रिय होत्या. लेखिका आणि संपादक म्हणून त्यांनी महत्त्वाची जबाबदारी सांभाळली. विद्या बाळ यांच 'मिळून साऱ्याजणी' हे मासिक अत्यंत गाजलं. Vidya Bal | ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या आणि लेखिका विद्या बाळ यांचं निधन | ABP Majha विद्या बाळ यांची कारकीर्द
  • विद्या बाळ यांचा जन्म 12 जानेवारी 1937 रोजी झाला.
  • 1958 साली पुण्यातील फर्ग्युसन कॉलेजमधून बी.ए. (अर्थशास्त्र) पदवी घेतली.
  • स्त्रियांच्या पुरुषांबरोबरच्या समान हक्कांविषयीच्या सामाजिक चळवळींमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग होता.
  • 'स्त्री' मासिकाच्या 1983 ते 1986 या काळात मुख्य संपादक
  • 1989 मध्ये 'मिळून साऱ्याजणी' हे मासिक सुरू केले.
  • याच मासिकातील निवडक 45 लेखांच्या संग्रहाचं 'स्त्रीमिती' नावाचं पुस्तक प्रसिद्ध झालं.
  • 1981 साली त्यांनी 'नारी समता मंच' या संस्थेची स्थापना केली.
  • ग्रामीण स्त्रियांमध्ये आत्मभान जागृत करणाऱ्या 'ग्रोइंग टुगेदर' या प्रकल्पाच्या प्रकल्प-प्रमुख म्हणून काम केलं.
विद्या बाळ यांचे प्रकाशित साहित्य
  • कादंबरी
  • तेजस्विनी
  • वाळवंटातील वाट
अनुवादित कांदबरी
  • जीवन हे असं आहे
  • रात्र अर्ध्या चंचाची
   चरित्र
  •  कमलाकी (डॉ. कमलाबाई देशपांडे यांचे चरित्र)