Hanuman Chalisa Loudspeaker Row LIVE : भोंग्यांवरुन सुरु असलेला गोंधळ सुरुच; प्रत्येक अपडेट्स एका क्लिकवर...
Case Registered Against Raj Thackeray : मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर भोंग्यावरुन सुरु असलेला गोंधळ राज्यभरात सुरुच आहे. प्रत्येक अपडेट्स पाहा...
सांगली जिल्ह्यात पाच वाजेपर्यंत मशिद आणि मंदिरावर लाऊडस्पीकर लावण्यास परवानगी मागणारे एकूण 50 अर्ज आलेत.
Mumbai News : आम्ही वांद्रे परिसरात निर्णय घेतला होता की प्रत्येक मशिदींमध्ये डेसिबल मीटर लावून सुप्रीम कोर्टाने दिलेल्या आदेशानुसार अजानचा आवाज ठेवला जाईल. त्याचबरोबर भोंग्यांच तोंड हिंदू वस्तीच्या दिशेला नसून मुस्लीम वस्तीच्या दिशेला असावं. या निर्णयमुळे आमच्या परिसरामध्ये आवाज एकदम कमी झाला आणि कोणाला त्रास नाही, कोणाची तक्रारही नाही. अशाप्रकारे संपूर्ण मुंबईमध्ये जर नियमांच पालन केलं तर कोणताही प्रश्न राहणार नाही, असं वक्तव्य काँग्रेस नेते हुसेन दलवाई यांनी केलं. तसंच मुंबईत अनेक मशिदींनी सकाळची अजान बंद केली आहे. तर अनेकांनी भोंगेही काढले आहेत. अनेक ठिकाणी भोंग्याशिवाय अजान दिली जात आहे. या बदलाचं स्वागत केलं पाहिजे, असंही ते म्हणाले.
राष्ट्रवादी महिला महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदी विद्या चव्हाण यांची नियुक्ती, राष्ट्रवादीच्या खासदार फौजिया खान यांची घोषणा
Mumbai News : मुंबईतल्या 1140 पैकी 930 मशिदींकडे भोंग्यांसाठी परवानगी असून तर 2400 पैकी 24 मंदिरांकडे भोंग्यांसाठी परवानगी असल्याची माहिती पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी दिली. भोग्यांबाबत मार्गदर्शक सूचनांसाठी मुंबईच्या पोलीस आयुक्तांनी सर्वधर्मियांच्या प्रतिनिधींसोबत बैठक बोलावली होती. त्यात त्यांनी ही माहिती दिली.
Breaking news : भोंग्याचा वाद सुरू असतानाच नाशिक पोलिसांकडे भोंगे लावण्याच्या परवानगीसाठी होताय अर्ज दाखल
प्रार्थना स्थळावर भोंगे लावण्यासाठी आतापर्यंत 60 अर्ज दाखल
नाशिक पोलिसांनी विविध कारणासाठी फेटाळले 39 अर्ज
उर्वरित अर्जाचा निर्णय प्रलंबित
मनसेच्या भूमिकेनंतर भोंगे अधिकृत करण्याकडे कल
शहरात जवळपास 87 मशिदी तर 800 हुन अधिक छोटीमोठी मंदिर
मुंबईत पहाटे 1 हजार 140 पैकी 135 मशिंदींवरील भोंग्यांचा वापर केला आहे. आत्तापर्यंत एकूण 18 हजार मनसेच्या कार्यकर्त्यांना 149 अंतर्गत नोटिसा देण्यात आल्याची माहिती सुत्रांनी दिल्या आहेत. एका रात्रीत 5 हजाराहून अधिक मनसेच्या कार्यकर्त्यांना नोटीसा देण्यात आल्या आहेत. राज्यातील 6 भागात अतिरिक्त पोलीस महासंचालक रस्त्यावर उतरले आहेत. राज्यात कुठेही कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवला नसल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.
Hanuman Chalisa Loudspeaker Row : मनसेचे नेते संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांनी पोलिसांच्या हातावर तुरी दिली. प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून ताब्यात घेण्यासाठी गेलेल्या पोलिसांना चकवा देत मनसेचे दोन्ही नेते निसटले, शिवाजी पार्क परिसरातील राज ठाकरे यांच्या निवासस्थानाजवळची ही घटना आहे. पोलिसांनी संदीप देशपांडे, संतोष धुरी यांना नोटीस बजावली होती. त्यानंतर कालपासूनच त्यांना ताब्यात घेण्यासाठी पोलिसांचा प्रयत्न होता. आज संदीप देशपांडे आणि संतोष धुरी माध्यमांसमोर आले. माध्यमांना प्रतिक्रिया देत असतानाच पोलीस त्यांना ताब्यात घेण्यासाठी दाखल झाले होते. आम्ही येतो असं सांगत देशपांडे आणि धुरी बाजूला झाले. त्याचवेळी पोलिसांना चकवा देत तिथे आलेल्या एका कारमध्ये बसून संदीप देशपांडे आणि संतोष धुरी निघून गेले. परिणामी पोलिसांचे हात रिकामेच राहिले. त्यानंतर पोलिसांनी मनसेच्या इतर कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं.
Hanuman Chalisa Loudspeaker Row : वरळी बीडीडी चाळीत पोलीस मनसैनिकांना ताब्यात घेण्याचं काम करत आहेत. सकाळच्या सत्रानंतर दुपारच्या सत्रात अजानवेळी गडबड होऊ नये यासाठी सर्व मनसैनिकांना ताब्यात घेतलं जातं आहे. वरळीचे मनसेचे पदाधिकारी हर्षल खरात यांच्या घरी पोलिसांनी अचानक धडक देत त्यांना ताब्यात घेतलं.
Hanuman Chalisa Loudspeaker Row : राजर्षी शाहू महाराजांच्या समतेचा विचार करवीरनगरीमध्ये इतका खोलवर पोहोचला आहे की, जातीय किंवा धार्मिक तेढ कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कधीही पाहायला मिळाला नाही. म्हणूनच आज जिल्ह्यामध्ये 400 मशिदीमध्ये नेहमीप्रमाणे आजान वाचली गेली आणि त्याला कोणाकडूनही विरोध झाला नाही. शिवजयंती असो किंवा शाहू जयंती असो. मुस्लीम बांधव मोठ्या उत्साहाने सहभाग घेतात तर हिंदू बांधव थेट मशिदीत ईदच्या शुभेच्छा देतात. कोल्हापुरातील अनेक तालमींमध्ये गणेशोत्सव आणि पिर यांच्या एकत्र स्थापना केली जाते.
Hanuman Chalisa Loudspeaker Row : मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज दुपारी पत्रकार परिषद घेणार आहेत. मुंबई आणि महाराष्ट्र पोलिसांनी मनसैनिकांवर केलेल्या कारवाईवर राज ठाकरे भाष्य करण्याची शक्यता आहे.
Raj Thackeray Rally : राज ठाकरे यांच्या औरंगाबाद सभेविरोधात याचिका दाखल करणाऱ्याला एक लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. याचिका निव्वळ राजकीय हेतूने प्रेरित असल्याचा ठपका हायकोर्टाने ठेवला आहे. जयकिशन कांबळे या याचिकाकर्त्याला दंडाची रक्कम विधी व न्यायविभागात जमा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने नुकताच हा निकाल जाहीर केला.
Hanuman Chalisa Loudspeaker Row : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. बॅरिकेडिंग देखील केली आहे. पोलीस उपायुक्तांकडून सुरक्षेचा आढावा घेण्यात आला.
Hanuman Chalisa Loudspeaker Row : पुणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल झाल्यानंतरही पुण्यात मनसे महाआरती करण्यावर ठाम आहे. मशिदीवरील भोंगे उतरवण्याबाबत राज ठाकरे यांनी आजचा अल्टिमेटम दिला आहे. या पार्श्वभूमीवर पुण्यात ठिकठिकाणी बंदोबस्त दिसून येत आहे. दरम्यान हनुमान जयंतीच्या दिवशी राज ठाकरे यांच्या हस्ते महाआरती झालेल्या खालकर मारुती मंदिरात आज सकाळी अकरा वाजता मनसेच्या वतीने महाआरती होणार आहे. महाआरती करण्यावर मनसे ठाम असली तरी काल ज्या पद्धतीने मनसे कार्यकर्त्यांवर पोलिसांची करडी नजर आहे, त्यामुळे दिवसभरात मनसे कार्यकर्ते काय भूमिका घेतात हे पाहणं महत्वाचं ठरेल.
बुलढाण्यातील खामगाव शहरातव्या चांदमारी भागातील हनुमान मंदिरात जाऊन पोलिसांनी लाऊडस्पिकर मशीन ताब्यात घेतल्याची घटना घडली. तर जळगाव जामोदमध्ये पोलीस बंदोबस्तात हनुमान चालीसा पठण करण्यात आले. खामगाव शहरातील चांदमारी भागातील हनुमान मंदिरावर लाऊडस्पीकर लावुन हनुमान चालीसा दररोज सकाळी सहानंतर आरतीच्या वेळेस वाजवण्यात येतो. परंतु आज शहर पोलीसांनी सकाळी पाच वाजेदरम्यान चांदमारी येथील मंदिरात जाऊन साऊंड सिस्टीम मशीन ताब्यात घेतली. विशेष बाब म्हणजे त्यावेळेस साऊंड सिस्टीम बंद होती. यावेळी पोलीस आणि मनसे कार्यकर्ते यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली. तसेच यावेळी शहरातील अनेक मस्जिदमध्ये सकाळी सहा वाजाण्याच्या आधीच भोंग्यावरुन अजान दिला गेली. यातील पोलीस आणि मनसे कार्यकर्ते यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली.
Hanuman Chalisa Loudspeaker Row : राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंग्यांविरोधात भूमिका कायम ठेवलीय. राज्यात ठिकठिकाणी मनसेकडून हनुमान चालिसा पठण करण्यात येणार आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबईत कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे रात्रीपासून पोलीस अलर्ट मोडवर आहेत. मुंबईतील रस्त्यावर ठिकठिकाणी नाकाबंदी करुन प्रत्येक वाहनांची तपासणी करण्यात येत आहे.
Hanuman Chalisa Loudspeaker Row : औरंगाबादमध्ये 48 मशिदींबाहेर पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवलाय. संवेदनशिल ठिकाणी पोलिसांनी कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवली आहे. राज ठाकरे यांनी औरंगाबादमध्ये 1 मे रोजी झालेल्या सभेतच मशिदीवरील भोंग्यांबाबत इशारा दिला होता. त्यानंतर पोलिसांनी शहरात संवेदनशील ठिकाणी पोलीस बंदोबस्तही वाढवला आहे.
Hanuman Chalisa Loudspeaker Row : आज कल्याण परिसरातील मशिदींमध्ये पहाटेच्या सुमारास अजाण भोंग्याविना झाली. अजाणसाठी लाऊडस्पीकर लावण्यात आले नव्हते. पोलीस यंत्रणेने शहरात कायदा सुव्यवस्था राखावी तसेच शांततेचे आवाहन पोलिस यंत्रणेकडून नागरिक तसंच मनसे कार्यकर्त्यांना करण्यात आले. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंग्यायाबाबत आक्रमक पवित्रा घेतला आहे. मशिदीवरील भोंग्यांसमोर हनुमान चालीसा लावण्याचे आवाहन राज ठाकरे यांनी मनसे कार्यकर्त्यांना केलं होतं. या पार्श्वभूमीवर शहरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस यंत्रणेने काल रात्रीपासूनच पाउले उचलण्यास सुरुवात केली. कल्याण डोंबिवलीमध्ये 50हून अधिक कार्यकर्त्यांना पोलिसांकडून नोटीस पाठवण्यात आली होती. मनसे आमदारालाही नोटीस पाठवण्यात आली होती. काल रात्रीच्या सुमारास मनसेच्या 20 ते 25 कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. काल रात्रीपासूनच मशिद, मंदिर परिसरात पोलिसांची गस्त सुरु आहे. शहरात काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मशीद तसंच मंदिराबाहेर पोलिसांचा पहारा दिसून येतोय. याच बरोबर पोलिसांनी मशिदीमधील विश्वस्तांसोबत चर्चा करुन आवाजाबाबत नियमांचे पालन करण्याचे आवाहन देखील केलं होतं.
Hanuman Chalisa Loudspeaker Row : ठाण्यातील मनसैनिकांनी आज पहाटे झालेल्या अजानचा विरोध करत लाऊडस्पीकरवर हनुमान चालिसा लावली. पहाटे 5.14 मिनटांनी ठाणे इंदिरा नगरमधील एका मशिदीवर अजान झाली. त्याचा विरोध म्हणून मनसे कार्यकर्ते पप्पू कदम यांनी या मशिदीच्या जवळच असलेल्या इंदिरा डोंगरावरच्या महालक्ष्मी मंदिरात भोंगा लावून हनुमान चालिसा पठण सुरू केलं. तर कल्याण डोंबिवलीमध्ये 50 हून अधिक कार्यकर्त्यांना पोलीस यंत्रणेकडून नोटीस पाठविण्यात आल्या होत्या. काल रात्रीच्या सुमारास मनसेच्या 20 ते 25 कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. काल रात्रीपासूनच मशिद-मंदिर परिसरात पोलिसांची गस्त सुरू आहे. कल्याण परिसरातील मशिदींमध्ये पहाटेच्या सुमारास अजान भोंग्याविना झाली. अजानसाठी लाऊडस्पीकर लावण्यात आले नव्हते. तसेच, नवी मुंबई- ऐरोलीजवळच्या जामा मशिदीसमोर हनुमान चालिसा पठणाचा प्रयत्न करण्यात आला होता. हनुमान चालिसा पठणाचा प्रयत्न करणाऱ्या मनसैनिकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
Hanuman Chalisa Loudspeaker Row : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या आदेशानंतर मनसैनिकांकडून भोंग्यांच्या विरोधात आंदोलन सुरू करण्यात आलं आहे. पहाटेच्या अजानवेळी मशिदींसमोर हनुमान चालिसा पठण करण्यात आलं आहे. मुंबईतील अनेक भागांत मनसैनिकांकडून मशिदींसमोर हनुमान चालिसा पठण करण्यात आलं. राज ठाकरेंनी दिलेला इशारा आणि आंदोलनामुळे रात्रीपासून राज्यभरात तगडा पोलीस बंदोबस्त आहे. तर अनेक ठिकाणी मनसे कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड सुरू आहे.
Hanuman Chalisa Loudspeaker Row : मनसे पदाधिकाऱ्यांना क्राईम ब्रान्चने ताब्यात घेतलं आहे. हनुमान चालीसा पठण करण्यासाठी जात असतानाच क्राईम ब्रँच युनिट 1 ने प्रतिबंधात्मक कारवाई केली. ताब्यात घेतलेल्या मनसे पदाधिकाऱ्यांना सरकारवाडा पोलिसांच्या ताब्यात देणार आहे. तर दुसरीकडे क्राईम ब्रान्चने ताब्यात घेतल्यानंतर मनसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी केली.
Hanuman Chalisa Loudspeaker Row : आतापर्यंत नाशिक शहरातील 16 मनसैनिकांना तडीपारीच्या नोटीस तर शंभरहून अधिक जणांना 149 च्या नोटीस दिल्या आहेत. पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे यांनी ही माहिती दिली.
Hanuman Chalisa Loudspeaker Row : जुने नशिकमधील छपरीच्या तालीम परिसरातील जबरेश्वर मंदिरावर पहाटे मनसे कार्यकर्त्यांनी भोंग्यावर हनुमान चालीसा लावली. मंदिराच्या दोन्ही बाजूस 100 मीटर अंतरावर पोलीस बंदोबस्त असताना मनसे कार्यकर्त्यांनी हनुमान चालीसा लावून धूम ठोकली.
नाशिकमधील सातपूर परिसरात भोंगा लावण्याच्या तयारीत असणाऱ्या मनसेच्या 6 कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. भद्रकाली पोलिसांनी जय श्रीरामच्या घोषणा देणाऱ्या महिलांना ताब्यात घेतले आहे. छपरीच्या तालीम परिसरातील श्री जबरेश्वर या छोट्या मंदिरासमोर हनुमान चालीसा लावून कार्यकर्त्यांनी धूम ठोकली आहे. पोलिसांनी ऍम्प्लिफायरसह इतर साहित्य जप्त केले आहे. दरम्यान, शहरातील सर्वच मशिदी बाहेर पोलिसांचा बंदोबस्त आहे. अनेक मशिदीवरील भोंगे आज वाजले नाहीत. तर काही ठिकाणी कमी आवाजात अजान जाली आहे.
Raj Thackeray : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्रक काढून मनसे कार्यकर्त्यांना आणि जनतेला भोंग्यांविरोधात आंदोलन तीव्र करण्याच्या सूचना दिल्या आहेत. मनसे कार्यकर्त्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे स्वत: रस्त्यावर उतरले असून शहरात फिरुन परिस्थितीचा आढावा घेत आहे. पोलीस आयुक्त सकाळीच धारावी परिसरात ड्युटीवर असलेल्या पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची चौकशी केली. त्यांच्याकडून परिस्थितीतबाबत माहिती घेतली.
Raj Thackeray : पोलिसांकडून कुठलीही नोटीस आलेली नाही. त्यामुळेऔरंगाबादला जाण्याचा विचार नाही, अशी माहिती मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एबीपी माझाला दिली आहे. शिवाय कार्यकर्त्यांना भोंग्यांसदर्भात आदेश देण्यासाठी पत्रक काढण्याचं काम सुरू असल्याचेही राज ठाकरे यांनी सांगितले.
Raj Thackeray : थोड्याच वेळात राज ठाकरे आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत. ट्वीटरच्या माध्यमातून राज ठाकरे भूमिका स्पष्ट करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Raj Thackeray : पुण्यातील खालकर मारुती मंदिरासमोर मनसेचे कार्यकर्ते जमायला सुरुवात झाली आहे. याच खालकर मारूती मंदिरामध्ये राज ठाकरे यांनी पहिली महाआरती केली होती. पोलिसांनी पुण्यातील काही प्रमुख मनसे पदाधिकाऱ्यांना नोटिसा पाठवल्या आहेत. प्रमुख पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेण्याची शक्यता आहे.
Loudspeaker Controversy : मुंबईतल्या मोठ्या मशिदींबाहेर पोलीस तैनात, QRT (क्विक रिस्पॉन्स टीम) चे जवान सुद्धा मशिदीबाहेर सुरक्षेसाठी तैनात करण्यात आले आहेत.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी 4 मे रोजीचा अल्टिमेटम दिला आहे. यामध्ये 4 मेपर्यंत मशिदीवरील भोंगे उतरावे, अशी भूमिका मनसेने घेतल्यानंतर कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये आणि शांतता प्रस्थापित राहावी, यासाठी मुंबई पोलिसांची तयारी. मशिदीबाहेर पोलीस सुरक्षा वाढवली आहे. ईद आणि उद्या दिलेला अल्टीमेंटम या पार्श्वभूमीवर ही सुरक्षा वाढवण्यात आली आहे.
Notice to MNS Leader : तिकडे औरंगाबादमधील मनसे पदाधिकाऱ्यांच्या घरी देखील पोलीस पोहोचले आहेत. मनसेचे जिल्हाध्यक्ष सुमीत खांबेकर यांना पोलिसांनी नोटीस दिली आहे. मनसेचे औरंगाबादमधील पदाधिकारी दिलीप धोत्रे आणि इतर पदाधिकाऱ्यांनाही पोलिसांनी नोटीस दिली आहे.
Notice to MNS Leader : एकीकडे राज ठाकरे यांच्यावर औरंगाबादेत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर दुसरीकडे मनसे नेत्यांनाही मुंबई पोलिसांनी नोटीस बजावण्यास सुरुवात केली आहे. मनसेचे नेते बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई आणि संदीप देशपांडे यांना नोटीस बजावण्यात आली आहे. सामाजिक तेढ निर्माण होईल असं कृत्य न करण्याची ताकीद या नेत्यांना देण्यात आली आहे.
Sanjay Raut on Case Registered Against Raj Thackeray LIVE : मशिदीवरील भोंग्यांच्या निमित्ताने राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न सुरू असल्याची चर्चा सुरू असताना शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी खळबळजनक आरोप केला आहे. राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्यासाठी महाराष्ट्राबाहेरील लोकांची मदत घेण्यात येत असल्याचे त्यांनी म्हटले. तर, दुसरीकडे राज्यातील गृह विभागाकडेदेखील अशाच प्रकारची माहिती असल्याने पोलीस सतर्क असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
माध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी सांगितले की, राज्याच्या बाहेरुन काही गुंड प्रवृत्तीचे लोक मुंबईत आणून गडबड करण्याचा प्रयत्न आहे. ज्यांची राज्यात ताकद नाही. अशा लोकांकडून हे काम सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला. महाराष्ट्रात अशा प्रकारच्या सुपाऱ्या चालणार नाही. मुख्यमंत्र्यांचे याकडे लक्ष असल्याचेही राऊत यांनी म्हटले. राज्यातील यंत्रणा,नेतृत्व सक्षम आहे. हे राज्य अस्थिर करण्याचा प्रयत्न करत असतील. तर ती त्यांची सर्वात मोठी चूक ठरणार असल्याचा इशाराही राऊत यांनी दिला. राज्यातील पोलीस योग्य पावले उचलत असल्याचे त्यांनी सांगितले.
FIR against Raj Thackeray : औरंगाबादमधील सिटी चौक पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक गजानन इंगणे यांच्या फिर्यादीनंतर हा गुन्हा दाखल झाला आहे. सिटी चौक पोलिसांनी नोंदवलेल्या गुन्ह्यानुसार राज ठाकरे हे प्रथम क्रमाकांचे आरोपी आहेत. राज ठाकरेंसह सभेला परवानगी मागणारे राजीव जवळीकर आणि इतर आयोजकांवर गुन्हा दाखल झाला आहे. सिटी चौक पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अशोक गिरी या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
- कलमं : 116, 117, 153 अ आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियम 135 (अटी शर्तींचा भंग करणे)
- 153 : भांडणाला चिथावणी देणं (परंतु, अद्याप कोणताही संघर्ष झालेला नाही.)
- 117 गुन्ह्याला मदत करणे, चिथावणीखोर भाषण, नॉन बेलेबल म्हणजे अजामीनपात्र गुन्हा आहे. आधी तपास होईल आणि त्यानंतर अटक करण्यात येऊ शकते.
- बहुतेक कलमं ही अजामीनपात्र आहेत. जामीन देण्याचा अधिकार न्यायालयाला आहे, पोलिसांना नाही. पोलीस नोटीस देऊ शकतात, हजर राहण्यास सांगू शकतात, किंवा आदेशांचं पालन न केल्यास अटकही होऊ शकते.
Hanuman Chalisa Row : "कोणीही कायदा हातात घेऊ नये. कायदा हातात घेतल्यास कारवाई केली जाईल. राज्यातील कायदा-सुव्यवस्था बिघडवू नका, असं आवाहन पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांनी केलं आहे. मुंबईतील पत्रकार परिषदेत ते म्हणाले की,"कायदा-सुव्यवस्था बिघडू नये यासाठी महाराष्ट्र पोलीस दल सज्ज आहे. सीआरपीएफच्या 87 कंपनी आणि 30 हजारांपेक्षा जास्त होमगार्ड तैनात आहेत. पोलिसांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत. कर्मचारी आणि अधिकारी रस्त्यावर आहेत."
Hanuman Chalisa Row : राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर झालेल्या सभेनंतर मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना नोटीस पाठवल्या जात आहेत. राज ठाकरे यांच्या सभेनंतर दोन समाजात तेढ निर्माण होण्याची पोलिसांनी शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे आपण तेढ निर्माण होईल असं कुठलंही कृत्य करु नये म्हणून पोलिसांनी नोटीस पाठवल्या आहेत. मनसेचे नेते बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई आणि संदीप देशपांडे यांनाही पोलिसांना नोटीस पाठवल्या आहेत.
Hanuman Chalisa Row : राज्याचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी मनसेला शांततेचं आवाहन करत कायदा हातात न घेऊ नये असं म्हटलं आहे. अटी-शर्तींसह औरंगाबाद पोलीस आयुक्तांनी मनसेच्या सभेला परवानगी दिली होती. या सभेदरम्यान अटी-शर्तींचं उल्लंघन झालं असेल तर आयुक्तांनी त्यांचा अधिकार वापरुन कारवाई केली असेल. कायदा सगळ्यांसाठी समान आहे. हे कायद्याचं राज्य आहे. कायदा हातात घेऊन रस्त्यावर उतरायचं हे चालणार नाही. कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी महाराष्ट्राचे पोलीस सज्ज आहेत. मनसेच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांना आवाहन करतो की, कायद्याला कायद्याने काम करु द्या, पोलिसांना त्यांचं काम करु द्या. कारवाई योग्य वाटत नसेल तर न्यायालय आहे, तिथे न्याय मागा. पण रस्त्यावर उतरुन सामान्य नागरिकांना त्रास होईल असं कृत्य करु नये, असं शंभूराज देसाई म्हणाले.
Loudspeaker Controversy : मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरेंवर औरंगाबादमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 1 मे रोजी महाराष्ट्र दिनी औरंगाबादमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची जाहीर सभा पार पडली. मनसेच्या या जाहीर सभेसाठी पोलिसांकडून अटी-शर्तींसह परवानगी देण्यात आली होती. परंतु, राज ठाकरेंनी सभेत अनेक अटींचं उल्लंघन आल्याचं समोर आलं होतं. सभेनंतर राज ठाकरेंवर गुन्हा दाखल करा, अशी मागणी विविध स्तरांतून होत होती. अशातच औरंगाबाद पोलिसांनी राज ठाकरे यांच्या सभेची टेप ऐकून राज ठाकरे यांच्या सभेत किती नियम पाळले आणि किती टाळले याचा आढावा घेतला. त्यानंतरच औरंगाबादमधील राज ठाकरे यांच्या सभेत पोलिसांनी घालून दिलेल्या अटींचं उल्लंघन झाल्याचं निष्पन्न झालं. त्यामुळे राज ठाकरेंवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Loudspeaker Controversy : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर औरंगाबादच्या सिटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. राज ठाकरे यांच्यासह आयोजकांविरोधातही गुन्हा नोंद करण्यात आला आहे. 1 तारखेला राज ठाकरे यांची औरंगाबादेत सभा झाली होती. या सभेतल्या वक्तव्याप्रकरणी राज यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चिथावणीखोर वक्तव्याप्रकरणी आणि अटीशर्तींचा भंग केल्याप्रकरणी हा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
पार्श्वभूमी
Loudspeaker Controversy : मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या आदेशानंतर मनसैनिकांकडून भोंग्यांच्या विरोधात आंदोलन सुरू (Hanuman Chalisa Loudspeaker Row LIVE) करण्यात आलं आहे. पहाटेच्या अजानवेळी मशिदींसमोर हनुमान चालिसा पठण करण्यात आलं आहे. मुंबईतील अनेक भागांत मनसैनिकांकडून मशिदींसमोर हनुमान चालिसा पठण करण्यात आलं. राज ठाकरेंनी दिलेला इशारा आणि आंदोलनामुळे रात्रीपासून राज्यभरात तगडा पोलीस बंदोबस्त आहे. तर अनेक ठिकाणी मनसे कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड सुरू आहे.
ठाण्यातील मनसैनिकांनी आज पहाटे झालेल्या अजानचा विरोध करत लाऊडस्पीकरवर हनुमान चालिसा लावली. पहाटे 5.14 मिनटांनी ठाणे इंदिरा नगरमधील एका मशिदीवर अजान झाली. त्याचा विरोध म्हणून मनसे कार्यकर्ते पप्पू कदम यांनी या मशिदीच्या जवळच असलेल्या इंदिरा डोंगरावरच्या महालक्ष्मी मंदिरात भोंगा लावून हनुमान चालिसा पठण सुरू केलं. तर कल्याण डोंबिवलीमध्ये 50 हून अधिक कार्यकर्त्यांना पोलीस यंत्रणेकडून नोटीस पाठविण्यात आल्या होत्या. काल रात्रीच्या सुमारास मनसेच्या 20 ते 25 कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. काल रात्रीपासूनच मशिद-मंदिर परिसरात पोलिसांची गस्त सुरू आहे. कल्याण परिसरातील मशिदींमध्ये पहाटेच्या सुमारास अजान भोंग्याविना झाली. अजानसाठी लाऊडस्पीकर लावण्यात आले नव्हते. तसेच, नवी मुंबई- ऐरोलीजवळच्या जामा मशिदीसमोर हनुमान चालिसा पठणाचा प्रयत्न करण्यात आला होता. हनुमान चालिसा पठणाचा प्रयत्न करणाऱ्या मनसैनिकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
औरंगाबादमध्येही कडेकोट बंदोबस्त
औरंगाबादमध्ये 48 मशिदींबाहेर पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवलाय. संवेदनशिल ठिकाणी पोलिसांनी कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवली आहे. राज ठाकरे यांनी औरंगाबादमध्ये 1 मे रोजी झालेल्या सभेतच मशिदीवरील भोंग्यांबाबत इशारा दिला होता. त्यानंतर पोलिसांनी शहरात संवेदनशील ठिकाणी पोलीस बंदोबस्तही वाढवला आहे.
मुंबई पोलीस अलर्ट मोडवर
राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंग्यांविरोधात भूमिका कायम ठेवलीय. राज्यात ठिकठिकाणी मनसेकडून हनुमान चालिसा पठण करण्यात येणार आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबईत कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे रात्रीपासून पोलीस अलर्ट मोडवर आहेत. मुंबईतील रस्त्यावर ठिकठिकाणी नाकाबंदी करुन प्रत्येक वाहनांची तपासणी करण्यात येतेय.
मनसे (Maharashtra Navnirman Sena) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्यावर अखेर गुन्हा दाखल झाला आहे. राज ठाकरे यांनी दोन दिवसापूर्वी 1 मे रोजी औरंगाबादमध्ये (Aurangabad) जाहीर सभा घेतली होती. या सभेला अटी शर्तींसह परवानगी दिली होती. मात्र या सभेदरम्यान नियम अटी न पाळल्याने औरंगाबादेतील सिटी चौक पोलीस ठाण्यात राज ठाकरेंवर गुन्हा दाखल झाला. औरंगाबादच्या सभेत त्यांनी मशिदींसमोरील भोंगा हटवला नाही तर दुप्पट आवाजानं हनुमान चालिसा लावू असा इशारा दिला होता. त्यासाठी 4 मे रोजीचा अल्टिमेटम दिला होता. आता याप्रकरणी पोलीस पुढे काय कारवाई करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरेंवर औरंगाबादमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 1 मे रोजी महाराष्ट्र दिनी औरंगाबादमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची जाहीर सभा पार पडली. मनसेच्या या जाहीर सभेसाठी पोलिसांकडून अटी-शर्तींसह परवानगी देण्यात आली होती. परंतु, राज ठाकरेंनी सभेत अनेक अटींचं उल्लंघन आल्याचं समोर आलं होतं. सभेनंतर राज ठाकरेंवर गुन्हा दाखल करा, अशी मागणी विविध स्तरांतून होत होती. अशातच औरंगाबाद पोलिसांनी राज ठाकरे यांच्या सभेची टेप ऐकून राज ठाकरे यांच्या सभेत किती नियम पाळले आणि किती टाळले याचा आढावा घेतला. त्यानंतरच औरंगाबादमधील राज ठाकरे यांच्या सभेत पोलिसांनी घालून दिलेल्या अटींचं उल्लंघन झाल्याचं निष्पन्न झालं. त्यामुळे राज ठाकरेंवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मनसेच्या नेत्यांना पोलिसांकडून नोटीस
राज ठाकरे यांच्या मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर झालेल्या सभेनंतर मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना नोटीस पाठवल्या जात आहेत. राज ठाकरे यांच्या सभेनंतर दोन समाजात तेढ निर्माण होण्याची पोलिसांनी शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे आपण तेढ निर्माण होईल असं कुठलंही कृत्य करु नये म्हणून पोलिसांनी नोटीस पाठवल्या आहेत. मनसेचे नेते बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई आणि संदीप देशपांडे यांनाही पोलिसांना नोटीस पाठवल्या आहेत.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -