मुंबईः महाराष्ट्रासाठी आज तांत्रिकदृष्ट्या पावसाळा संपला आहे. देशात आणि राज्यातही यावर्षी समाधानकारक पाऊस झाला. आनंदाची बाब म्हणजे चार वर्षे दुष्काळाने होरपळलेल्या मराठवाड्यात यंदा सरासरीच्या 21 टक्के जास्त पाऊस पडला आहे.


देशात 1 जून ते 30 सप्टेंबर या काळातील सरासरीच्या 3 टक्के कमी पाऊस पडला. देशात सरासरी 883.6 मिमी पाऊस पडतो, यंदा 857.9 मिमी म्हणजेच सरासरीच्या 3 टक्के कमी पाऊस पडला.

दुष्काळाने त्रस्त महाराष्ट्रावर वरुणराजा मेहरबान

मराठवाडा आणि कोकण-गोव्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला तर विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात सरासरी इतका पाऊस पडला. संपूर्ण राज्याचा विचार करता महाराष्ट्रात या काळात 1002.7 मिमी पाऊस पडतो. यंदा 1159.7 मिमी म्हणजे सरासरीच्या 16 टक्के जास्त पाऊस पडला.

महाराष्ट्रात 1 जून ते 30 सप्टेंबर या काळात विभागनिहाय पडलेला पाऊस

मध्य महाराष्ट्रात याकाळात सरासरी 723.9 मिमी. पाऊस पडतो. प्रत्यक्षात 819.9 मिमी म्हणजेच सरासरीच्या 13 टक्के जास्त पाऊस पडला.

मराठवाड्यात678.9 मिमी. पाऊस पडतो. प्रत्यक्षात 823.1 मिमी. म्हणजे सरासरीच्या 21 टक्के जास्त पाऊस पडला.

विदर्भात सरासरी 952.0 मिमी. पाऊस पडतो. प्रत्यक्षात 1029.3 मिमी म्हणजेच सरासरीच्या 8 टक्के जास्तपाऊस पडला.

कोकण आणि गोव्यात 2905.2 मिमी. पाऊस पडतो, प्रत्यक्षात 3549.5 मिमी म्हणजेच सरासरीच्या 22 टक्केजास्त पाऊस पडला.

जून ते सप्टेंबर असा पडला पाऊस

राज्यातील सर्व तालुक्यात सरासरीच्या 25 टक्क्यांपेक्षा जास्त पाऊस झाला.

एका तालुक्यात सरासरीच्या 25 ते 50 टक्के पाऊस झाला.

54 तालुक्यात सरासरीच्या 50 ते 75 टक्के पाऊस झाला.

112 तालुक्यात सरासरीच्या 75 ते 100 टक्के पाऊस झाला.

186 तालुक्यात सरासरीच्या 100 टक्के किंवा त्याहून अधिक पाऊस झाला.