रायगडच्या समुद्रकिनाऱ्यावर संशयास्पद बोट आढळली
एबीपी माझा वेब टीम | 30 Sep 2016 03:35 PM (IST)
रायगड : रायगडच्या पश्चिम समुद्रकिनाऱ्यावर संशयास्पद बोट आढळली आहे. स्थानिक मच्छिमारांनी तटरक्षक दला, नौदल, कोस्टल पोलिसांना ही माहिती दिली. हिरव्या आणि गुलाबी रंगाच्या ह्या बोटीतील दहा लोक मुंबईकडे जाणारा मार्ग विचारत होते. शिवाय ही बोट त्या परिसरातील नव्हती आणि लोकही ओळखीचे नव्हते, अशी माहितीही मच्छीमारांनी दिली. यानंतर पश्चिम किनारट्टीवरील सागरी गस्त वाढवली आहे. तटरक्षक दलाने मुंबई पोलिसांनाही याबाबत माहिती दिली आहे. शिवाय बोटीचा तपास सुरु आहे.