नांदेडसह अनेक जिल्ह्यात दलित संघटनांनी प्रतिमोर्चे काढण्याची तयारी सुरु केली आहे. त्यासंदर्भात विनायक मेटे आज पुण्यात बोलत होते.
"मराठा समाजाचा मोर्चा हा कोणत्याही पक्षाचा किंवा नेत्याचा नाही. तसंच हे मोर्चे राष्ट्रवादी पुरस्कृत मोर्चे आहेत, असं भाष्य करणारे चुकीचे आहेत. हे मोर्चे दलितांविरोधात असल्याचा सूर माध्यमांमध्ये आहे, पण तो बरोबर नाही," असं मेटे यांनी सांगितलं.
अॅट्रॉसिटी कायद्याबाबत बोलताना विनायक मेटे म्हणाले की, "एखाद्या कायद्याचा जाच होत असेल, तर त्यावर बोलण्याचा हक्क खुद्द घटनाकार बाबासाहेब आंबेडकरांनीच दिला आहे."
तसंच मराठा समाजाचे मोर्चे हे दलित समाजाच्या विरोधात नाहीत, असं मत मांडणाऱ्या प्रकाश आंबेडकर यांचं विनायक मेटेंनी अभिनंदन करुन आभार मानले.
पाहा व्हिडीओ