हिंगोली : हिंगोलीत पब्जी गेम खेळण्यात दंग असलेल्या दोन मित्रांना रेल्वेने चिरडले. नागेश गोरे (22) आणि स्वप्नील अन्नपुर्णे (24) अशी मृत युवकांची नावे आहेत.  नागेश  आणि स्वप्नील हिंगोली येथील खटकाळी बायपास भागात रेल्वे रुळावर बसून दोन मित्र आपल्या मोबाईलवर  पब्जी गेम खेळत होते.

सायंकाळी 7  वाजण्याच्या सुमारास रेल्वे आल्याने गेममध्ये मग्न असलेले दोन्ही मित्र रेल्वेखाली येऊन जागीच मृत झाले. दोन्ही मित्रांना गेम खेळत असताना आपला जीव गमावला लागला.  घटनास्थळी बघ्याची मोठ्या प्रमाणावर गर्दी जमली होती. अंधार असल्याने नागरिकांनी मोबाईल बॅटरीच्या साहाय्याने मृतदेह ओळखले. हे दोघेही हनुमान नगर येथील  रहिवाशी असल्याची माहिती समोर आली आहे.
या दोन्ही मित्रांनी सायंकाळी 6.45 च्या सुमारास रेल्वे रुळाजवळ आपली मोटारसायकल उभी करून रेल्वे रुळावरच मोबाईल वर पब्जी गेम खेळत बसले. याचवेळी अचानक  अजमेर-हैदराबाद ही रेल्वे आल्याने या दोघांना धडक लागल्याने दोघेजण रेल्वेखाली चिरडले गेले आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला.


काही वेळामध्ये या रस्त्यावरून ये- जा करणाऱ्या नागरिकांच्या निदर्शनास ही बाब आल्याने घटनास्थळी मोठी गर्दी जमली. त्यातील काही जणांनी घटनेची माहिती पोलिसांना दिली. दरम्यान याचवेळी दुसरी रेल्वे आली असता स्थानीय नगरसेवक राम कदम यांनी रेल्वे थांबविली. घटनास्थळी पोलीस उपनिरीक्षक कांबळे आल्यानंतर युवकांनी रेल्वे रुळावरील दोन्ही युवकाचे मृतदेह बाजूला काढल्यानंतर उभी केलेली रेल्वे निघून गेली.


VIDEO | 11 वर्षीय मुलाचं पब्जी बॅनसंबंधी मुख्यमंत्र्याना पत्र | मुंबई | एबीपी माझा