मुंबई : भारतीय रेल्वेच्या सुरक्षा दलाने केलेल्या कामगिरीत रेल्वेतील सामानाची चोरी करण्यामध्ये महाराष्ट्र अव्वल असल्याची माहिती समोर आली आहे.

एकट्या महाराष्ट्रातून 2 लाख 23 हजार चोरांना पकडण्यात रेल्वे पोलिसांना यश आलं आहे. तर महाराष्ट्रापाठोपाठ उत्तर प्रदेशामधून 1 लाख 22 हजार चोरांना पकडण्यात आलं आहे.

रेल्वेतल्या प्लेटस्, तारा, बाथरूमचे फिटिंग्ज, पंखे, टॉवेल, ब्लँकेट अशा सामानाची चोरी करताना आरपीएफने चोरांना पकडलं आहे. काही महाभाग चोरांनी काही दिवसांपूर्वी तेजस एक्सप्रेसचे नळही गायब केले होते.

दरम्यान, रेल्वेच्या लोखंडी ब्रेक ब्लॉकची चोरी वाढल्याने रेल्वेने त्या जागी फायबरचे ब्लॉक लावण्यास सुरूवात केली आहे. अशीही माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे.