औरंगाबाद : औरंगाबादेतील प्रोझोन मॉलमध्ये असणाऱ्या दोन स्पा आणि मसाज पार्लरवर पोलिसांनी छापा टाकला आहे. याप्रकरणी तीन ग्राहक आणि मॅनेजरसह बारा परदेशी मुलींना ताब्यात घेण्यात आलं आहे.


स्पाच्या नावाखाली इथे अश्लील चाळे होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर प्रोझोन मॉलमधील डी स्ट्रेस हब आणि अनंतरा या फॅमिली स्पावर ही कारवाई करण्यात आली.

दरम्यान, अटक केलेल्या सर्व मुली या थायलंडच्या असल्याची माहिती समोर आली आहे. सध्या पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.