शाळेच्या पटांगणात झाड कोसळलं, 20 विद्यार्थी जखमी
एबीपी माझा वेब टीम | 28 Jun 2017 01:12 PM (IST)
रायगड: शाळेच्या पटांगणात झाड कोसळल्यामुळे 20 विद्यार्थी जखमी झाले आहेत. रायगड जिल्ह्यातील पोलादपूर तालुक्यातील कापडे बुद्रुक इथं ही धक्कादायक घटना घडली. वरदायिनी माध्यमिक विद्यालयाच्या पटांगणात हे झाड कोसळल्यानं, मैदानावर असलेले विद्यार्थी जखमी झाले. जखमी 20 पैकी दोन विद्यार्थिनी गंभीर आहेत. सर्व जखमींना उपचारासाठी महाड आणि पोलादपूर येथील रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. दरम्यान, रायगडसह कोकणात पावसाचा जोर कायम आहे. वादळी वाऱ्यासह पाऊस कोसळत असल्याने नागरिकांची तारांबळ उडाली आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्गात तर समुद्राला आलेल्या उधाणामुळे भव्य लाटा उसळत आहेत. त्याचा फटका कोकण किनारपट्टीला बसत आहे.