रायगडमध्ये साखरपुड्याची व्हॅन दरीत पडून तिघांचा मृत्यू
एबीपी माझा वेब टीम | 15 Mar 2018 10:00 AM (IST)
पिकअप गाडीतून सर्व नातेवाईक पोलादपूरला साखरपुड्याला जाताना रायगडातील आडवळे गावाजवळ अपघात झाला
रायगड : रायगडमध्ये साखरपुड्यासाठी जाणारी नातेवाईकांची पिक अप व्हॅन दरीत कोसळून अपघात झाला. आडवळे परिसरात गाडी दरीत कोसळून तिघा जणांचा मृत्यू झाला, तर 15 जण जखमी आहेत. काही जण दरीत असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. पिकअप गाडीतून सर्व नातेवाईक पोलादपूरला साखरपुड्याला जात होते. आडवळे गावाजवळील वळणावर बुधवारी रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास गाडी 50 ते 60 फूट खोल दरीत कोसळली. भिकू तुकाराम मालुसरे, पांडुरंग धोंडू बीरमणे, अनिकेत अनंत सकपाळ यांचा मृत्यू झाला. जखमींना पोलादपूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून तीन प्रवासी गंभीर असल्याचं नातेवाईकांनी सांगितलं. बहुतांश अपघातग्रस्त प्रवासी आडवळे आणि पार्टेकोंडचे रहिवासी असल्याची माहिती देण्यात आली आहे.