एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 14/03/2018

  1. उत्तरप्रदेश, बिहार पोटनिवडणुकीत भाजपचा धुव्वा, यूपीच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात भाजपचा पराभव, तर अररियात राजदच्या उमेदवाराचा मोठ्या फरकाने विजय https://goo.gl/BqAeAk

  2. कोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरणी मिलिंद एकबोटेंना पुण्यातल्या घरातून अटक, सुप्रीम कोर्टाने अटकपूर्व जामीन फेटाळताच पोलिसांची कारवाई https://goo.gl/QNKFmw

  3. सहकारमंत्री सुभाष देशमुखांच्या अडचणीत वाढ, सोलापुरातील बंगला बेकायदेशीर असल्याचे कागदपत्र, देशमुखांकडून मात्र ठाम समर्थन https://goo.gl/9SSNku

  4. पुण्यात मंगेशकर रुग्णालयात मांत्रिकाकडून मंत्रोपचार करणाऱ्या डॉ. सतीश चव्हाणांवर गुन्हा, डॉक्टर पसार, मांत्रिकही मोकाट https://goo.gl/q8jZqp

  5. मुख्यमंत्री फडणवीसांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प रखडला, निधी नसल्याने जलयुक्त शिवारची कामं थांबली https://goo.gl/EvixYH

  6. नाशिक महापालिका आयुक्त तुकाराम मुंढेंनी जुनी फाईल उघडली, कुंभमेळ्याचं पुन्हा ऑडिट होणार https://goo.gl/oX21UT

  7. महिलेच्या नावे फेक फेसबुक अकाऊण्ट, धुळ्याच्या 37 वर्षीय पुरुषाकडून मुंबईतील 15 महिलांना गंडा https://goo.gl/HcSHVN

  8. सीडीआर लीक प्रकरणी पहिल्या महिला खासगी गुप्तहेर रजनी पंडित यांना जामीन, 40 दिवसांनंतर जेलमधून बाहेर https://goo.gl/Typ8Z4

  9. बारमध्ये लवकरच छापील किंमतीनुसार मद्य मिळणार, महसूल वाढवण्यासाठी फडणवीस सरकारची पावलं https://goo.gl/rRGHYE

  10. गुजरात विधानसभेत राडा, काँग्रेस आमदाराने भाजप आमदाराला पट्ट्याने मारलं, आमदारांमध्ये खडाजंगी https://goo.gl/PW4bmU

  11. एलफिन्स्टन रोड स्टेशन चेंगराचेंगरीतील मृतांच्या नातेवाईकांना आर्थिक मदतीचं वाटप, मृतांच्या कुटुंबीयांना आठ लाख, तर गंभीर जखमींना सात लाख https://goo.gl/dfzysE

  12. रस्त्यातील झाड कापलं, पण बुंधा तसाच ठेवल्याने झालेल्या अपघातात महिलेचा मृत्यू, आई गमावलेल्या मुलीचा रस्त्यासाठी लढा, मुख्यमंत्र्यांकडे सोशल मीडियातून साद https://goo.gl/DgL5tw

  13. प्रसिद्ध भौतिकशास्त्रज्ञ प्रा. स्टीफन हॉकिंग यांचं निधन, पृथ्वीच्या उत्पत्तीचं रहस्य मांडणारा अवलिया हरपला https://goo.gl/vxPKYT

  14. मराठ्यांचा इतिहास मोठ्या पडद्यावर, आशुतोष गोवारीकर यांच्या 'पानिपत'चं पोस्टर रिलीज, संजय दत्त आणि अर्जुन कपूर मुख्य भूमिकेत https://goo.gl/zRYP7n

  15. हैदर, रईस, काबिल फेम अभिनेते नरेंद्र झा यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन, पालघरमधील फार्म हाऊवर अखेरचा श्वास https://goo.gl/BRd9xx


BLOG : सुप्रसिद्ध लेखिका कविता महाजन यांचा ब्लॉग - शेवटचा दिस गोड व्हावा https://goo.gl/XzGFep


माझा विशेष : उत्तर प्रदेश, बिहारच्या पोटनिवडणुकीत भाजपचं पानिपत, विशेष चर्चा रात्री 9 वाजता, एबीपी माझावर

एबीपी माझाचे सर्व व्हिडीओ - https://www.youtube.com/abpmajhalive

@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा