Raigad News : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. सर्वच राजकीय पक्षांनी तयारीला सुरुवात केली आहे. या निवडणुकाच्या अनुशंघाने राजकीय नेते वेगवेगळी वक्तव्य करत आहेत. अशातच शिवसेना शिंदे गटाचे महेंद्र दळवी यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये सर्व जागांवर स्वबळावर लढण्याची आमची तयारी असल्याचं वक्तव्य आमदार महेंद्र दळवी यांनी केलं आहे.
रायगड जिल्ह्यातील सर्वच जागा शिंदे सेना जिंकेल
पेण येथे शिवसेना (शिंदे गट) कार्यकर्त्यांची आज आढावा बैठक पार पडली. या आढावा बैठकीतून आमदार महेंद्र दळवी यांनी आगामी काळातील निवडणुकीचे स्पष्ट संकेत दिले आहेत. येणाऱ्या पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये पक्ष ताकद म्हणून स्वबळावर सर्व जागांवर निवडणुका जिंकेल. शिवाय युती की महायुती याबाबत पक्षाची भूमिका असणारच आहे. परंतू, रायगड जिल्ह्यातील सर्वच जागा शिंदे सेना जिंकेल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. त्यामुळे राष्ट्रवादीसोबत न जाण्याचाच एकंदरीत सूर या बैठकीत आमदार महेंद्र दळवी यांचा दिसून आला आहे. यावेळी शिवसेनेचे सर्वच जिल्ह्यातील वरिष्ठ नेतेमंडळी उपस्थित होते.
आगामी निवडणुकांमध्ये महायुती, आघाड्या होत राहतील. पण येथे ताकद आमच्याकडेच असल्याचं वक्तव्य दळवी यांनी काही दिवसापूर्वी केलं होते. त्यामुळे आम्ही वारंवार येथे येत राहू असे सांगत त्यांनी रायगडमधील आपली राजकीय उपस्थिती बळकट करण्याचा निर्धार केला होता. त्याचबरोबर, आता काही कमी पडू देणार नाही. तुम्ही सज्ज व्हा," असा संदेश त्यांनी उपस्थित जनतेला दिला होता.
गेल्या काही दिवसापासून रायगड जिल्ह्यात राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना शिंदे गट असा संघर्ष सुरु आहे. खासदार सुनील तटकरे आणि शिवसेना शिंदे गटाचे मंत्री भरत गोगावले यांच्यात सातत्यानं कलगीतुरा रंगल्याचं देखील पाहायला मिळत आहे. तसेच आमदार महेंद्र दळवी देखील तटकरे यांच्यावर कडाडून प्रहार करताना दिसत आहेत. काही दिवसापूर्वी माजी आमदार अनिकेत तटकरे यांनी महेंद्र दळवी यांच्यावर “चिटर” अशी टीका केली होती. त्याला प्रत्युत्तर देताना दळवी म्हणाले, “तुझा बाप चिटर आहे,” अशा शब्दांत त्यांनी पलटवार केला. या विधानामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले होते.
महत्वाच्या बातम्या: