Maharashtra Landslide : इर्शाळवाडीत दोन दिवसात 770 मिमी, तळीयेत 550 मिमी, दरड दुर्घटनांमध्ये पाऊस काळ बनला, किती मिमी बरसला?

Irsalwadi Landslide Live Updates : रायगड जिल्ह्यातील खालापूरजवळील इरशाळवाडीवर (Irshalwadi) इथं दरड (Landslide) कोसळल्याची घटना घडली. यामध्ये 100 हून अधिक लोक अडकल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सत्यम सिंह Last Updated: 20 Jul 2023 05:18 PM
Irsalwadi Landslide: पावसामुळे इर्शाळवाडीतील बचावकार्य थांबवलं; 98 जणांना वाचवण्यात यश, 12 जणांचा मृत्यू
Maharashtra Irsalwadi Landslide: इर्शाळवाडीतील बचावकार्य थांबवण्यात आले असून 98 जणांना सुखरुप वाचवण्यास यश आले आहे. Read More
Maharashtra Landslide : इर्शाळवाडीत दोन दिवसात 770 मिमी, तळीयेत 550 मिमी, दरड दुर्घटनांमध्ये पाऊस काळ बनला, किती मिमी बरसला?
Maharashtra Landslide : सततच्या पावसामुळे महाराष्ट्राची तीन गावं उद्धवस्त झाली. या तीन गावांपैकी सर्वात जास्त पावसाची नोंद ही इर्शाळवाडीमध्ये झाली आहे. Read More
Khalapur Irshalwadi Landslide : पश्चिम घाटातील पर्वतरांगांमध्ये भूस्खलनाच्या घटनांमध्ये दहा वर्षांत शंभर पटीने वाढ; कारणं काय? उपाय काय?
पश्चिम घाटातील पर्वतरांगांमध्ये भूस्खलनाच्या घटनांमध्ये दहा वर्षांत शंभर पटीने वाढ झाल्याचं पर्यावरण शास्त्रज्ञ माधव गाडगीळ सांगतात. Read More
Khalapur Irshalwadi Landslide : आतापर्यंतच्या दुर्घटनांमधे किती पावसाची नोंद झाली?

Khalapur Irshalwadi Landslide : आतापर्यंतच्या दुर्घटनांमधे किती पावसाची नोंद झाली?


इर्शाळवाडी : 2 दिवसांत 770 मिमी पावसाची नोंद


तळीये : 5  दिवसांत  550 मिमी


माळीण : 3 दिवसांत 550 मिमी 

इर्शाळवाडीत दोन दिवसांत 770 मिमी पावसाची नोंद

आतापर्यंतच्या दुर्घटनांमधे किती पावसाची नोंद झाली आहे


इर्शाळवाडीत दोन दिवसांत 770 मिमी पावसाची नोंद झाली आहे. 


तळीये - 5  दिवसांत  550 मिमी


माळीण - 3 दिवसांत 550 मिमी

Khalapur Irshalwadi Landslide : इर्शाळवाडीमध्ये जोरदार पावसाला सुरुवात; बचावकार्यात अडथळे

Khalapur Irshalwadi Landslide : इर्शाळवाडीमध्ये जोरदार पावसाला सुरुवात...


मुसळधार पावसामुळे बचावकार्यात अडथळे...


जोरदार वाऱ्यांमुळे गावातील आणखी एक घर कोसळलं...

L&T ची एक मोठी रेस्क्यू टीम दुर्घटनास्थळी दाखल

Khalapur Irshalwadi Landslide : इर्शाळवाडी दुर्घटनेनं संपूर्ण देश हादरला आहे. अशातच बचावकार्य सुरू करण्यात आलं आहे, मात्र खराब हवामानामुळे बचावकार्यात अडथळे येत आहेत. दरम्यान, NDRF, TDRF सह इतरही पथक बचावकार्यासाठी घटनास्थळी दाखल झाली असून L&T ची एक मोठी रेस्क्यू टीम इर्शाळवाडीच्या ठिकाणी पोहोचली आहे. 

Khalapur Irshalwadi Landslide : दुर्घटनाग्रस्त इर्शाळवाडी येथे नागरिकांनी गर्दी करू नये, राज्य सरकारचं आवाहन

Khalapur Irshalwadi Landslide : भारतीय हवामान विभागाने राज्यातील काही जिल्ह्यांना अति मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. गेल्या दोन दिवसांपासून राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडत आहे. इरशाळवाडी वस्तीवर दरड कोसळून दुर्घटना घडली असून तेथे मदतकार्य युध्दपातळीवर सुरु आहे. या परिसरात पाऊस सुरु असून इर्शाळवाडी येथे नागरिकांनी गर्दी  न करण्याचे आवाहन राज्य शासनाने केले आहे. अति मुसळधार पावासाची शक्यता असल्याने नागरिकांनी घराबाहेर पडू नये, आवश्यक आणि अतिमहत्वाचे काम असल्यासच घराबाहेर पडावे, असे आवाहन राज्य शासनानं केलं आहे.

Khalapur Irshalwadi Landslide : ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरेही दुर्घटनास्थळी

Khalapur Irshalwadi Landslide : ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरेही दुर्घटनास्थळी  दाखल झाले आहेत. त्यांनी उपस्थितांची भेट घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला आहे. 

इथे मदत कार्य करणं अवघड आहे, परिस्थिती सध्याच्या वातावरणात हाताबाहेर गेल्याचं दिसतंय : गिरीश महाजन

Khalapur Irshalwadi Landslide : दुर्घटनास्थळी सगळ्यात आधी रात्री मंत्री गिरीश महाजन पोहोचले होते. त्यांनी एबीपी माझाशी संवाद साधलाय. ते म्हणाले की, "रात्री सर्वात आधी मी वरती आलो तेव्हा प्रचंड पाऊस होता मदत कशी पोहोचवायची हा प्रश्न होता. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री सारखे मला फोन करत होते. माळीणचा अनुभव मला होता, तिथे सुद्धा मी सर्वात आधी पोहोचलो होतो. पण इथे मदत कार्य करणं अवघड आहे, परिस्थिती सध्याच्या वातावरणात हाताबाहेर गेल्याचं दिसतंय. आतापर्यंत आठ मृतदेह काढण्यात आले आहेत, त्यांचा दफन विधीसुद्धा इथेच करत आहोत. स्थानिक लोक आपल्या नातेवाईकांसाठी वरती येत आहेत, त्यांचा आक्रोश पाहतोय. तर दुसरीकडे इथले स्थानिक लोक इथं मदतसुद्धा करत आहेत."

L&T ची एक मोठी रेस्क्यू टीमची तुकडी इर्शाळवाडीवर दाखल

 Khalapur Irshalwadi Landslide : L&T ची एक मोठी रेस्क्यू टीम ची तुकडी रेस्क्यू करण्यासाठी इर्शाळवाडीवर दाखल झाली आहे.

काय घडलं? कसं घडलं? सध्याची परिस्थिती काय? बचाव कार्य कसं केलं जातंय? उपमुख्यमंत्री फडणवीसांनी विधानसभेत सविस्तर सांगितलं
Khalapur Irshalwadi Landslide : इर्शाळवाडीवर कोसळलेल्या दरडीखाली अंदाजे 40 घरं दबल्याचा अंदाज आहे. तर अंदाजे 250 ची वस्ती आहे. या दुर्घटनेत अग्निशमन दलाच्या एका जवानाचा आदिवासी पाड्यापर्यंत पोहोचताना दम लागल्यानं मृत्यू झाला आहे. Read More
इर्शाळवाडी दुर्घटनेत आत्तापर्यंत दहा जणांचा मृत्यू, पाच मृतांची नावे समोर

 Khalapur Irshalwadi Landslide : इर्शाळवाडी दुर्घटनेत आत्तापर्यंत दहा जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये दोन चिमुकल्यांचा समावेश आहे. 


इर्शाळवाडी दुर्घटनेतील मृयांची नावे



1) रमेश हरी भवर, वय 26
2) जयश्री रमेश भवर, वय 22
3) रुद्रा रमेश भवर, वय 1 वर्ष
4) विनोद भगवान भवर, वय 4 वर्ष
5) जिजा भगवान भवर, वय 36


जखमींची नावे -


1) प्रवीण पांडुरंग पारधी, 21 वर्षं
2) यशवंत राघो डोरे, वय 37 वर्षं
3) भगवान हरी भवर, वय 25 वर्षं
4) मनीष यशवंत डोरे, वय 35 वर्षं



बचाव कार्यासाठी नवी मुंबई येथील अग्निशमन दलाचे पथ इर्शाळवाडी येथे जात असताना पथकातील कर्मचारी शिवराम यशवंत ढुमणे यांचा मृत्यू झाला आहे.


श्वसनाचा त्रास झाल्याने मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. अग्निशमन दलाचे कर्मचारी 48 वर्षीय यशवंत ढुमणे यांचा मृत्यू झाला आहे

खालापूर दुर्घटनास्थळी शिवसेना आमदार आदित्य ठाकरे दाखल

खालापूर दुर्घटनास्थळी शिवसेना नेते आमदार आदित्य ठाकरे, शिवसेना आमदार अनिल परब आणि सुनील प्रभू दुर्घटनास्थळी रवाना झाले आहेत.

Irshalwadi Landslide : इर्शाळवाडी दुर्घटनास्थळी मोफत शिवभोजन थाळीच्या पाकिटांचं वाटप, छगन भुजबळ यांची घोषणा

Irshalwadi Landslide : रायगडमधील इर्शाळवाडी इथे झालेल्या दुर्घटनास्थळी मोफत शिवभोजन थाळीच्या पाकिटांचं वाटप करण्यात येणार आहे. राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी हा निर्णय जाहीर केला. आजूबाजूच्या शिवभोजन केंद्रावरुन ही पाकिटं देण्यात येणार आहेत. त्याचबरोबर पाच लिटर रॉकेल देण्यात येणार आहे. सोबतच दहा किलो तांदूळ, 10 किलो गहू किंवा गव्हाचे पीठ, तूरडाळ, तेल, साखर देखील देण्यात येणार आहे. जोपर्यंत परिस्थिती पूर्व पदावर येत नाही तोपर्यंत हा पुरवठा सुरुच राहणार आहे. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना तातडीने आदेश दिले आहेत.

रायगड इरशाळवाडी दुर्घटनेमध्ये आतापर्यंत 10 जणांचा मृत्यू

Khalapur Irshalwadi Landslide : रायगडमधील ईरशाळवाडी दुर्घटनेमध्ये आतापर्यंत 10 जणांचा मृत्यू


तर 21 जण जखमी आहेत


या गावातील लोकसंख्या 228 आहे


48 कुटुंबांचा ही वाडी होती


57 लोकांना आतापर्यंत बाहेर काढल आहे


त्यातील 60 ते 70 लोक गावाच्या बाहेर होते

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाहीर केला यावर्षी वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय

Irshalwadi Landslide : रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडी येथे घरांवर दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तीव्र दु:ख व्यक्त केले असून यावर्षी वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा 22 जुलै रोजी वाढदिवस असून राज्यभरातील त्यांचे चाहते, कार्यकर्ते, हितचिंतक दरवर्षी मोठ्या प्रमाणावर हा वाढदिवस साजरा करतात. इर्शाळवाडी दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर कुणीही आपला वाढदिवस साजरा करु नये. पुष्पगुच्छ, होर्डिंग, जाहिरातींवर खर्च न करता तो निधी इर्शाळवाडी गावाच्या पुनर्उभारणी आणि ग्रामस्थांच्या मदतीसाठी उपयोगात आणावा, असं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे. 

पावसामुळं मदत कार्यात अडथळी, आत्तापर्यंत सात जणांचे मृतदेह मिळाले : गिरीश महाजन

Khalapur Irshalwadi Landslide : पाऊस पडत असल्याने मदत कार्यात मोठा अडथळा येत आहे. आत्तापर्यंत सात जणांचे मृतदेह मिळाले असल्याची माहिती मंत्री गिरीश महाजन यांनी दिली. हेवी मशिनरी या ठिकाणी आणता येत नसल्याने मदतकार्याला मर्यादा येत आहेत . हवामान खराब असल्याने आणि डोंगराळ भाग असल्याने हेलिकॅाप्टर चा वापर करता येणार नसल्याचे महाजन म्हणाले.

इरशाळवाडी दुर्घटनाग्रस्तांची मंत्री अदिती तटकरे यांनी रुग्णालयात घेतली भेट

खालापूर जवळील इरशाळ वाडी येथे दरड कोसून जखमी झालेल्या नागरिकांवर कळंबोली येथील एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू असून महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी आज सकाळी या रुग्णांची भेट घेत विचारपूस केली. जखमींच्या उपचाराचा सर्व खर्च शासन करणार आहे. 


रुग्णांवर योग्य उपचार करण्यात यावे आणि या दुर्घटनेतील अजून जखमी नागरिक रुग्णालयात आल्यास प्रशासनाने सज्ज असावे यासाठी डॉक्टरांशी चर्चा केली.  


यावेळी एमजीएम चे डॉ. सागर, पनवेल महापालिकेचे डॉ. गोसावी  नायब तहसीलदार पनवेल श्री. लाचके
उपस्थित होते.

इर्शाळवाडीत 48 कुटुंबात 248 लोक राहत होते

Khalapur Irshalwadi Landslide :  इर्शाळवाडीत 248 लोक राहत होते. 48 कुटुंब होती. हे दरड प्रवणक्षेत्र नव्हतं

Khalapur Irshalwadi Landslide : सध्या बचाव कार्याला प्राधान्य, दोन हेलिकॉप्टर तयार, पण खराब हवामानामुळं टेकऑफ अशक्य : मुख्यमंत्री
Khalapur Irshalwadi Landslide : हवाई मार्गानं बचावकार्य करण्याचा पर्याय विचारधीन आहे. दोन हेलिकॉप्टर तयार आहेत, मात्र खराब हवामानामुळे टेकऑफ करणं शक्य नाही, असं मुख्यमंत्री म्हणाले आहेत. Read More
Irshalwadi Landslide : आतापर्यंत 80 लोकांना बाहेर काढण्यात रेस्कूय टीमला यश

 Khalapur Irshalwadi Landslide : इर्शाळवाडी दुर्घटनेत आतापर्यंत 80 लोकांना बाहेर काढण्यात रेस्कूय टीमला यश आलं आहे. पाच जणांचा मृत्यू झाला आहे. 

इर्शाळवाडीच्या दुर्घटनेवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचं ट्वीट 

इर्शाळवाडीच्या दुर्घटनेवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी ट्वीट करत प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे की,'झालेल्या मुसळधार पावसामुळे  महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यामध्ये झालेल्या दुर्घटनेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी संवाद साधला आहे. एनडीआरएफची 4 पथकं घटनास्थळी पोहचली असून स्थानिक प्रशासन देखील बचाव कार्य करत आहेत. तसेच घटनेमध्ये जखमी झालेल्या लोकांवर तात्काळ उपचार करण्याचे निर्देश देखील देण्यात आले आहेत.' 

NDRF ला मदत करण्यासाठी स्थानिक तरूण , स्वंयसेवी संस्थांचा सहभाग 

 Khalapur Irshalwadi Landslide : पाऊस बंद झाल्याने मदत कार्याला गती आली आहे. 


NDRF team ला मदत करण्यासाठी स्थानिक तरूण , स्वंयसेवी संस्थांचा सहभाग 


मोठ्या प्रमाणात माती असल्याने मॅन्युअली खोदकाम करण्यास लागतोय विलंब


पावूस , धुके कमी झाल्याने ईरशाळगडाचा कडा स्पष्टपणे दिसला

इर्शाळवाडी दुर्घटनेत मृत झालेल्यांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत जाहीर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची माहिती

इर्शाळवाडी दुर्घटनेत मृत झालेल्यांच्या नातेवाईकांना राज्य सरकारनं पाच लाखांची मदत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केली आहे, 

पाऊस, हवा आणि धुकं असल्यानं इर्शाळवाडीत बचावकार्यात अडचण

 Khalapur Irshalwadi Landslide : इर्शाळवाडी दुर्घटनेत मोठ्या प्रमाणात माती खाली आल्यानं ती बाजूला करण्यात अडचणी येत आहेत.  मोठ्या मशिनरी या ठिकाणी आणता येत नसल्याने जवानांच्या साह्याने मलबा बाजूला करण्यास विलंब लागत आहे. सध्या पाऊस, हवा, धुक्याची अडचण येत आहे. 

उपमुख्यमंत्री अजित पवार मंत्रालयातील आपत्कालिन नियंत्रण कक्षात, इर्शाळवाडीत घडलेल्या घटनेचा घेतला आढावा

उपमुख्यमंत्री अजित पवार मंत्रालयातील आपत्कालिन नियंत्रण कक्षात पोहचले असून तिथून रायगड जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे खालापूरनजिक इर्शाळगड परिसरात गावावर दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेतील नागरिकांच्या बचाव आणि मदतकार्याचं संनियंत्रण करीत आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे इर्शाळगड इथं दाखल

CM Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे इर्शाळगड इथं दाखल झाले आहेत. तेथील परिस्थितीचा आढावा मुख्यमंत्री घेत आहेत. हेलिकॉप्टरद्वारे रेस्क्यू ऑपरेशन केलं केले जाणार आहे. तशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्याची माहिती मिळत आहे. 

Khalapur Irshalwadi Landslide : रात्री मित्रांसोबत शाळेत झोपलेलो, तेवढ्यात मोठ्ठा आवाज झाला अन्...; बचावलेल्या तरुणाचा काळीज पिवळटणारा थरारक अनुभव
Khalapur Irshalwadi Landslide : घटनास्थळी नातेवाईकांचा आक्रोश पाहायला मिळतोय. अद्याप 100 ते 120 जण बेपत्ता असल्याची माहिती मिळत आहे. घटनेत सुदैवानं बचावलेल्या तरुणांनी आपला अनुभव सांगितला. Read More
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे इर्शाळगड इथं दाखल

CM Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे इर्शाळगड इथं दाखल झाले आहेत. ते तेथील परिस्थितीचा आढावा घेत आहेत. 


 

डोंगरावर ढिगाऱ्याखाली 15 ते 20 लहान मुलं अडकल्याची माहिती

Raigad Irsalwadi Landslide : डोंगरावर ढिगाऱ्याखाली 15 ते 20 लहान मुलं अडकल्याची माहिती मिळत आहे.

रायगडातील इर्शाळवाडीवर दरड कोसळली; बचावकार्यासाठी जाताना अग्निशमन दलाच्या जवानाचा दम लागल्यानं मृत्यू
Khalapur Irshalgad Landslide : अंधार आणि पावसामुळे माती निसरडी झाल्यानं वाडीपर्यंत पोहोचण्यास मदत पथकाला बचावकार्यात अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. Read More
120 ते 130 लोकं आतमध्ये अडकले असल्याची प्राथमिक माहिती

Raigad Irsalwadi Landslide :  120 ते 130 लोकं आतमध्ये अडकले असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे

इरशाळगडावर NDRF चे बचावकार्य सुरु

इरशाळगडावर एकूण 210 जण राहतात. यातील 100 च्या वर लोक बेपत्ता आहेत. NDRF चे बचावकार्य सुरु आहे. दरम्यान, बचावकार्य सुरु असताना एका अग्निशमन विभागाच्या जवानाचा वर चढताना दम लागून मृत्यू झाला आहे. 

पार्श्वभूमी

Raigad Irsalwadi Landslide Live Updates : राज्याच्या विविध भागात मुसळधार पाऊस सुरु आहे. या पावसामुळं बुधवारी रात्री रायगड (Raigad) जिल्ह्यातील खालापूरजवळील इरशाळवाडीवर (Irshalwadi) (इर्शाळगड) इथं दरड (Landslide) कोसळल्याची घटना घडली. यामध्ये 100 हून अधिक लोक अडकल्याची शक्यता वर्तवली जात आहे. आतापर्यंत 25 लोकांना रेस्क्यू करण्यामध्ये यश आलं आहे. तर यामध्ये चार जणांचा मृत्यू झाला आहे. 


गावात 50 ते 60 घरांची वस्ती


या गावात 50 ते 60 घरांची वस्ती असून जवळपास 200 ते 300  मतदार असल्याची माहिती मिळाली आहे. मातीच्या ढिगाऱ्याखाली अंदाजे 30 ते 40 घरातील लोक अडकल्याची माहिती मिळाली आहे. रात्री साडेदहा ते अकरा वाजण्याच्या सुमारास ही लँड्स लाईडची घटना घडली आहे. रायगड जिल्ह्यामधील इरसालगड इथं ही घटना घडली आहे. NDRF चे बचावकार्य सुरु आहे. डोंगरावर सतत सुरू असलेला लँड्स लाईड आणि जोरदार पावसामुळे रेस्क्यूमध्ये अडचण निर्माण होत आहे. आता पर्यंत 25 लोकांना रेस्क्यू करण्यामध्ये यश आलं आहे.यात 4 जणांच्या दुर्दैवी मृत्यू झाली आहे. आतापर्यंत 25 लोकांना रेस्क्यू करण्यामध्ये यश आलं आहे. तर यामध्ये चार जणांचा मृत्यू झाला आहे. 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.