Shiv Sena Vs Shinde Group : राज्यातील सत्तासंघर्षावर काही वेळात सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू होणार आहे. मात्र त्यापूर्वीच शिंदे गटाचे मंत्री अब्दुल सत्तार यांनी राज्यातील राजकीय घडामोडींवर मोठा गौप्यस्फोट केला आहे. एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत बोलताना, शिंदे गटाकडून शिवसेना पक्षप्रमुख म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची निवड करण्यात आल्याची माहिती अब्दुल सत्तार यांनी दिली आहे. विशेष म्हणजे 40 आमदार आणि 16 शिवसेना खासदारांच्या उपस्थितीत घेण्यात आलेल्या ठरावात हा निर्णय घेण्यात आल्याचं सत्तार म्हणाले आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून शिंदे गटाकडून शिवसेना प्रमुख कोण असणार याबाबत चर्चा सुरू होती. मात्र याबाबत आज पहिल्यांदाच शिंदे गटाकडून खुलासा करण्यात आला आहे. एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत बोलताना अब्दुल सत्तार म्हणाले की, सत्तासंघर्षावर सुनावणी सुरू असताना न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या प्रतिज्ञापत्रात शिंदे गटाचे शिवसेना पक्षप्रमुख म्हणून एकनाथ शिंदे यांची नावाचा उल्लेख करण्यात आलेला आहे. याबाबत आमच्या राष्ट्रीय कार्यकारिणीने घेतलेल्या ठरावात हा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातील शिंदे गटाचे सर्व खासदार, आमदार जिल्हाप्रमुख आणि पदअधिकाऱ्यांच्या एकमताने हा निर्णय घेण्यात आल्याचंही सत्तार म्हणाले आहे.
खैरेंची प्रतिक्रिया...
यावर प्रतिक्रिया देतांना शिवसेनेचे चंद्रकांत खैरे म्हणाले की, एकनाथ शिंदे शिवसेनापक्षप्रमुख होऊच शकत नाही. घटना मान्य करावी लागते, त्यानंतर पक्ष वाढीचे काम होते. यांनी घटना मान्य केलीच नाही. जेवढे बंडखोर आहेत हे सर्व उद्धव ठाकरे पक्षप्रमुख म्हणून त्यांच्या नेतृत्वाखाली निवडून आले आहेत. त्यामुळे त्यांना अशाप्रकारे शिवसेनापक्षप्रमुख निवडण्याचा कोणताही अधिकार नाही.
महत्वाच्या बातम्या...
Maharashtra Political Crisis : ठाकरे, शिंदे गटात अस्तित्वाची लढाई; महाराष्ट्रातल्या सत्तासंघर्षावर आज 'सर्वोच्च' सुनावणी