Rahul Gandhi on Maratha Reservation : इंडिया आघाडी सत्तेत आल्यास देशातील आरक्षणाची मर्यादा 50 टक्के काढून टाकू, अशी महत्त्वपूर्ण घोषणा काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi on Maratha Reservation) यांनी पुण्यातील जाहीर सभेत केली. दलित 15 टक्के, अदिवासी 8 टक्के आणि मराठा, धनगरांसह मागास वर्गास 50 टक्के, असे 73 टक्के आरक्षण देण्याची घोषणा त्यांनी केली. पुण्यातील काँग्रेस उमेदवार रविंद्र धंगेकर यांच्या प्रचारार्थ राहुल गांधी यांची सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत राहुल गांधी यांनी राज्यात अत्यंत संवेदनशील झालेल्या मराठा आरक्षणाला हात घातला. 


विनोद पाटलांकडून भूमिकेचं स्वागत


दरम्यान, राहुल गांधी मराठा आरक्षणावर बोलल्यानंतर मराठा आरक्षणासाठी न्यायालयीन लढा दिलेल्या विनोद पाटील यांनी स्वागत केलं आहे. त्यांनी राहुल गांधी यांचा व्हिडिओ ट्विटरवर पोस्ट केला आहे. त्यांनी ट्विट करत म्हटले आहे की, राहुल गांधी मराठा आरक्षणावर बोलले! त्यांनी सांगितलं की, आमचं सरकार देशात आल्यास जातीय जनगणना करू व 50% आरक्षण मर्यादा ओलांडण्याचा कायदा संसदेत करू. राहुलजी गांधी यांच्या भूमिकेचं स्वागत करतो.






जातीवर आधारित जनगणना करणार 


राहुल गांधी यांनी सभेतून सांगितले की, आमचं सरकार आल्यानंतर जातीवर आधारित जनगणना केली जाईल. जातीच्या संख्येनुसार सर्वांना संधी दिली जाईल. देशातील शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी केली जाईल. अग्निवीर योजनेसह जीएसटी बंद केला जाईल. सध्या पेपरफुटीचे प्रमाण वाढले आहे. पेपर लीक करणाऱ्यांनाही कडक शिक्षा दिली जाईल. सर्व पेपर सरकारी आयोगामार्फत घेतले जातील, अशी ग्वाही त्यांनी आपल्या भाषणातून दिली. 


पीएम मोदी आणि भाजपला संविधान संपवायचं असल्याचा आरोपही गांधी यांनी केला. आमची लढाई संविधान वाचविण्याची आहे. संविधान संपविले जाईल, त्यादिवशी तुम्ही भारत देशाला ओळखू शकणार नाही. महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले संविधान आम्ही कधी संपवू देणार नाही, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.


इतर महत्वाच्या बातम्या