Rahul Gandhi :  काँग्रेस खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi ) यांच्याविरुद्ध सावरकर यांची बदनामी केल्याचा आरोप होता. याप्रकरणी नाशिक (Nashik) येथील दंडाधिकारी न्यायालयाने फौजदारी खटला सुरू करण्याचे आदेश दिले होते. परंतू राहुल गांधी यांच्या वतीने दाखल केलेल्या पुनर्निरीक्षण अर्जावर जिल्हा सत्र न्यायालयाने सुनावणी केली आहे. यामध्ये राहुल गांधी यांना मोठा दिलासा मिळाला आहे. 

Continues below advertisement


न्यायालयाने नमूद केले की, दंडाधिकारी न्यायालयाने खटला सुरु करतांना योग्य कायदेशीर प्रक्रियेचे पालन केले नाही आणि पुराव्यांचा तपास न करता निर्णय घेतला. जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश यांनी या खटल्यात दंडाधिकारी यांच्याकडून कायदेशीर प्रक्रियेचा विचार न करता खटला सुरू केल्याचे निरीक्षण नोंदवत, दंडाधिकारी न्यायालयाला पुन्हा प्रक्रिया तपासून पुढील कारवाई करण्याचे निर्देश दिले. तसेच दंडाधिकारी न्यायालयाने साक्षीदार आणि पुराव्यांची पडताळणी देखील केली नसल्याचे सांगत, खटला रद्द करण्यात आला.


नेमकं प्रकरण काय?


राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी भारत जोडो यात्रे दरम्यान, मराठवाड्यातील हिंगोली इथं आपल्या भाषणात सावरकरांविरोधात टिप्पणी केली होती. सावरकरांनी तत्कालीन ब्रिटीश सरकारची माफी मागितली आणि त्यांच्याकडून ते आर्थिक मदत घेत होते, असं राहुल गांधींनी म्हटलं होतं. त्यांच्या या विधानावर आक्षेप घेत नाशिकमधील देवेंद्र भुतडा आणि अॅड मनोज पिंगळे यांनी नाशिकच्या कनिष्ठ न्यायालयात राहुल गांधींनी सावरकरांची बदनामी केल्याप्रकरणी फौजदारी खटला दाखल केला होता. यावर वेळोवेळी झालेल्या सुनावणीनंतर राहुल गांधींना जामीन मंजूर झाला होता. यावेळी त्यांनी आपल्याला कलम 500 आणि 504 अन्वये करण्यात आलेले आरोप मान्य नसल्याचंही म्हटलं होतं. तसंच या प्रकरणात त्यांना कोर्टाकडून जामीनही मंजूर झाला होता.


दंडाधिकारी यांच्याकडून कायदेशीर प्रक्रियेचा विचार न करता खटला सुरू केल्याचे निरीक्षण


जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश यांनी या खटल्यात दंडाधिकारी यांच्याकडून कायदेशीर प्रक्रियेचा विचार न करता खटला सुरू केल्याचे निरीक्षण नोंदवत, दंडाधिकारी न्यायालयाला पुन्हा प्रक्रिया तपासून पुढील कारवाई करण्याचे निर्देश दिले. तसेच दंडाधिकारी न्यायालयाने साक्षीदार आणि पुराव्यांची पडताळणी देखील केली नसल्याचे सांगत, खटला रद्द करण्यात आला. त्यामुळं या प्रकरणात काँग्रेस खासदार राहुल गांधी यांना मोठा दिलासा मिळाला आहे. 


महत्वाच्या बातम्या:


Bihar Election Result 2025 Rahul Gandhi: राहुल गांधींनी तलावात उडी मारली, मच्छीमारी केली; बिहारच्या बेगुसराय मतदारसंघात निकाल काय लागला?