मुंबई: हिंदुंना हिंसक म्हणणाऱ्या आणि हिंदुंचा कायम तिरस्कार करणाऱ्या राहुल गांधीना  (Rahul Gandhi) आषाढी वारीत (Ashadhi wari 2024)  येण्याचं निमंत्रण द्यायचा मौलाना शरद पवारांना (Sharad Pawar) कोणी अधिकार दिला? अशा बोचऱ्या शब्दात टीका करत आचार्य तुषार भोसले (Tushar Bhosale) यांनी महाविकास आघाडीसह राहुल गांधी आणि शरद पवारांवर निशाणा साधला आहे. शरद पवारांच्या गावातून तुकोबांची पालखी शेकडो वर्षांपासून जाते. पण शरद पवारांचे त्यांच्या 84 वर्षांच्या आयुष्यात पाय कधी वारीकडे वळले नाहीत आणि ते कोणत्या तोंडाने राहुल गांधीला निमंत्रण देत आहेत? अशा सवालही तुषार भोसले यांनी केला आहे.


इप्तार पार्ट्या झोडणाऱ्यांना आजपर्यंत कधी वारी दिसली नाही?- तुषार भोसले


राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा आणि अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यंदाच्या आषाढी वारीत (Ashadhi Wari) सहभागी होणार आहेत. शरद पवार हे 7 जुलैला तुकोबांच्या पालखीत वारकऱ्यांसोबत (Ashadhi Wari) सहभागी होणार आहे. दरम्यान, शरद पवार 7 जुलैला तुकोबांच्या पालखीत वारकऱ्यांसोबत (Ashadhi Wari) चालणार अशा चर्चांना मधल्याकाळात उधाण आले होते. मात्र यावर स्वत: शरद पवारांनी स्पष्टीकरण देत मी वारीत चालणार नसून केवळ पंढरपूरला जाणाऱ्या पालखीच्या स्वागतासाठी मी थांबणार असल्याचे सांगितले. वारी माझ्या गावावरून जाते त्यामुळे त्या   ठिकाणी एक दिवस मी थांबणार आहे. मात्र मी पालखीसोबत चालणार नाही तर तिच्या स्वागतसाठी तिथे जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.


तर दुसरीकडे याच मुद्याला घेऊन भाजपच्या अध्यात्मिक आघाडीचे नेते तुषार भोसले (Tushar Bhosale) यांनी शरद पवारांवर टीकेची झोड उठवली आहे. कायम इप्तार पार्ट्या झोडणारे शरद पवार आणि राहुल गांधी यांना आजपर्यंत कधीच वारी आणि वारकरी दिसले नाहीत. मात्र, आता महाराष्ट्राच्या निवडणूका डोळ्यांसमोर ठेऊन तुम्ही वारीत यायला बघताय, हे न कळायला महाराष्ट्राची जनता दुधखुळी नाही हे लक्षात ठेवा. अशा शब्दात तुषार भोसले यांनी टीका केली आहे. 


राहुल गांधी पंढरपुरात जाऊन विठुरायाचे दर्शन घेणार?


लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्राने काँग्रेसच्या झोळीत भरभरून 13  जागांचे दान दिल्यानंतर आता महाराष्ट्रातील सर्वात मोठा उत्सव असणाऱ्या आषाढी सोहळ्यासाठी लोकसभेचे विरोधीपक्ष नेते राहुल गांधी हे 13 किंवा 14 जुलै रोजी पंढरपुरात येऊन विठुरायाचे दर्शन घेणार आहेत . याबाबत काँग्रेसच्या एका जेष्ठ नेत्याने यास दुजोरा दिला असून 17 जुलै रोजी आषाढी एकादशीचा महासोहळा असल्याने त्यापूर्वी 13 किंवा 14 जुलै रोजी राहुल गांधी विठ्ठल मंदिरात येऊन दर्शन घेणार आहेत . त्यापूर्वी पालखी सोहळ्यासोबत चालण्याचा आनंदही त्यांना घ्यायचा असून याबाबत देखील प्रयत्न करण्यास सुरुवात झाली आहे . यावेळी पालखी सोहळे हे माळशिरस तालुक्यात असणार असून यावेळी माळशिरस ते वेळापूर या मार्गावर राहुल गांधी वारकऱ्यांसोबत वारीत सहभागी होण्याची शक्यता आहे .


इतर महत्वाच्या बातम्या