अहमदनगर : काँग्रेसचे नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचा विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी स्वीकारला आहे. काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी याबाबतची माहिती दिली आहे. आज शिर्डी येथे आयोजित पत्रकार परिषदेत चव्हाण बोलत होते.


VIDEO | संगमनेरमध्ये राहुल गांधींच्या सभेत राधाकृष्ण विखे पाटील जाणार? | स्पेशल रिपोर्ट | एबीपी माझा



राधाकृष्ण विखे पाटलांचा मुलगा सुजय विखे यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्यानंतर राधाकृष्ण विखेंच्या पक्षनिष्ठेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते. त्यामुळेच विखेंनी पक्षश्रेष्ठींकडे विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर राहुल गांधींनी आज तो स्वीकारल्याचे चव्हाण यांनी सांगितले. तसेच आपण विखेंशी बोललो असून, काँग्रेसचे काम करण्यासाठी ते अनुकूल असल्याचे चव्हाण म्हणाले.

विखेंबरोबरच अहमदनगर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष करण ससाणे यांचाही राजीनामा स्वीकारण्यात आला असून पूर्ण जिल्हा समिती बरखास्त केल्याचेही चव्हाण यांनी सांगितले.

VIDEO | राधाकृष्ण विखे पाटलांचा विरोधीपक्ष नेतेपदाचा राजीनामा राहुल गांधींनी स्वीकारला | एबीपी माझा