Raghunath Dada Patil : रघुनाथ दादा पाटील (Raghunath Dada Patil ) यांच्या शेतकरी संघटनेच्या (Shetkari sanghtana) वतीने राज्यभरात 19 फेब्रुवारी ते 19 मार्च दरम्यान संपूर्ण कर्जमुक्तीसाठी जागृती अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. या अभियानाची सांगता पुणे येथे 19 मार्च रोजी एक दिवसीय धरणे आंदोलनाने होणार असल्याचे मत शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांनी पंढरपूर येथे व्यक्त केले. या संपूर्ण कर्जमुक्ती अभियानाच्या माध्यमातून एक महिना राज्यभरातील विविध भागातील शेतकऱ्यांचे जनजागृती केली जाणार असून, यामध्ये सर्व शेतमालावरील निर्यात बंदी उठवावी असेही ते म्हणाले.

नेमक्या काय आहेत मागण्या?

महाराष्ट्रातील सर्व शेतकरी, शेतमजूर, बारा बलुतेदार यांची कर्जातून मुक्तता करावी असे मत रघुनात दादा पाटील यांनी व्यक्त केले. दुधासह सर्व शेतीमालास उत्पादन खर्चावर आधारित भाव मिळावा. शेतीपंपासाठी दिवसा पूर्ण दाबाने वीज पुरवठा करण्यात यावा. ऊसाला प्रति टन 5000 रुपये भाव मिळावा. दोन कारखान्यामधील अंतराची अट रद्द करण्यात यावी. वन्य प्राणी संरक्षण कायदा रद्द करण्यात यावा या मागण्यांसाठी हे जागृती अभियान राज्यभरातील विविध जिल्ह्यांमध्ये सुरु आहे. याचा सांगता समारंभ 19 मार्च रोजी पुणे येथे धरणे आंदोलनाने होणार आहे. यासाठी राज्यभरातील शेतकऱ्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथ पाटील यांनी केले आहे.

अर्थसंकल्पाकडे राज्याचं लक्ष

राज्याचे अर्थमंत्री अजित पवार सोमवारी राज्याचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. शेतकऱ्यांना अर्थसंकल्पात कर्जमाफी, नमो शेतकरी सन्मान योजनेच्या निधीत वाढ, कापूस आणि सोयाबीनसाठी भावांतर योजना आणि ठिबक, शेततळे तसेच विहीर अनुदानात वाढ करण्याची अपेक्षा आहे. पण आता अजितदादा अर्थसंल्पात काय घोषणा करतात आणि शेतकऱ्यांच्या कोणत्या अपेक्षा पूर्ण होतात, हे सोमवारीच कळेल. नमो शेतकरी सन्मान योजनेच्या निधीत वाढू करू, असे आश्वासन भाजपने निवडणुकीच्या काळात तर दिलेच होते. पण नुकतेच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नमो शेतकरी सन्मान योजनेचा निधी सध्याच्या 6 हजारांवरून 9 हजार रुपये करू, असे सांगितले. सध्या शेतकऱ्यांनी पीएम किसानचे 6 हजार आणि नमो शेतकरी सन्मान योजनेचे 6 हजार, असे एकूण 12 हजार रुपये मिळतात. दरम्यान, उद्या जाहीर होणाऱ्या अर्थसंकल्प अजित पवार नेमक्या कोणत्या मोठ्या घोषणा करणार याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे.

महत्वाच्या बातम्या:

Freebies Politics:  शेतकऱ्यांची कर्जमाफी,महिलासाठी मोफत प्रवास ते मोफत वीज, राज्यांच्या योजनांवर आरबीआयकडून चिंता