मुंबई : मागासवर्ग आयोगावर सरकारचा दबाव होता, असं म्हणत आरक्षणाबाबात सरकार वेळकाढूपणा करतं असल्याचा आरोप विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला आहे. मराठा, मुस्लिम, धनगर आणि लिंगायत समाजासोबत सरकारची ठकबाजी सुरु असल्याचा घणाघातही त्यांनी केला आहे.
अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सरकारनं आरक्षणाचा अहवाल सादर करण्याची मागणीही विखे पाटील यांनी केली आहे. राज्यातील ज्या जनतेनं ठग्ज ऑफ हिंदोस्तान हा सिनेमा फ्लॉप केला, तीच जनता आता महाराष्ट्रातील ठकांनाही फ्लॉप करुन दाखवेल असा दावाही विखेंनी केला आहे.
दुसरीकडे शिवसेना आणि भाजपला निवडणुकीच्या तोंडावरच राम आठवल्याची टीका विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली आहे.
मागासवर्ग आयोगावर सरकारचा दबाव, राधाकृष्ण विखे पाटलांचा आरोप
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
18 Nov 2018 05:31 PM (IST)
मागासवर्ग आयोगावर सरकारचा दबाव होता, असं म्हणत आरक्षणाबाबात सरकार वेळकाढूपणा करतं असल्याचा आरोप विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -