अहमदनगर : सरकारने मराठा आरक्षणा संदर्भात भूमिका स्पष्ट केली आहे.राज्यात कुणबी दाखलेंच्या संदर्भात विशेष मोहीम हाती घेतलेली आहे. त्याचं वाटप झालं पाहिजे ही भूमिका आमची आहे. 54 लाख दाखल्यांची नोंद सापडली आहे, पुढील प्रक्रिया सुरू आहे. सरकारने पाऊल पुढे टाकलेलं आहे, जरांगे पाटलांनी सरकारच्या भूमिकेला प्रतिसाद देऊन आपलं आंदोलन स्थगित केलं पाहिजे. शरद पवार केंद्रात मंत्री राहिले त्यांनी मराठा आरक्षणासाठी काय प्रयत्न केले आहे त्यांनी एकदा सांगावे असं देखील महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलं आहे.


22 जानेवारी रोजी आयोध्या येथे श्रीराममूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार असून यासाठी देशभरात जय्यत तयारी सुरू आहे. देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या सोहळ्यापूर्वी देशभरातील मंदिरांची स्वच्छता करण्याचे आवाहन केले होते त्या आव्हानाला प्रतिसाद देत भाजपचे मंत्री आणि नेते स्वच्छता मोहीम हाती घेत असून अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव शहरात शनी मंदिरात राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी हाती पोछा घेत मंदिराची स्वच्छता केली. यावेळी अजित पवार गटाचे आमदार आशुतोष काळे यांनीही स्वच्छ्ता केली.


22 तारखेचा क्षण सुवर्ण अक्षरात लिहिला जाईल -


22 तारखेचा क्षण सुवर्ण अक्षरात लिहिलं जाईल,जगभरात असलेल्या कोट्यवधी रामभक्तांच्या मनात आनंद आहे.राज्य सरकारने सुट्टी जाहीर केली, प्रत्येक नागरीक पुढाकार घेउन घरासमोर रांगोळी काढणे गुढी उभारणे सगळ्याच गोष्टीत नागरिकांचा आनंद गगनात मावेना असा दिसत असून या दिवशी नागरिकांनी दिवाळी साजरी करावी, असे विखे पाटील म्हणाले.


 तलाठी भरती प्रकिया रद्द होणार नाही -


तलाठी भरती प्रकिया रद्द होणार नाही कारण त्यात पुर्ण पारदर्शकता पाळली गेली आहे.कोणावर अन्याय झालेला नाही कुणीतरी बातम्या पेरतय.राजकिय पुढाऱ्यांनी हजारो मुलांच्या भावनेशी खेळू नये.आज निकाल वेबसाइटवर गेलेलं आहे, ज्यांचे गुणवत्ता यादीत नावं आले त्यांना संधी मिळणार आहे, असे विखे म्हणाले. 


जिल्हा विभाजनाचा प्रस्ताव नाही


श्रीरामपुर जिल्ह्याच्या मागणीसाठी आंदोलन सुरू असल्याचे प्रश्न विचारले असता विखे पाटील म्हणाले,सध्या राज्यापुढे कोणत्याही नवीन जिल्ह्याच्या निर्मितीचा प्रस्ताव नाही.शेतकऱ्यांसाठी विविध योजना सरकार राबवत आहे अनेक प्रश्न आहे.जिल्हा सरकारच्या दृष्टीने प्राधान्य क्रम नाही असे विखे यांनी म्हटलं आहे.


महायुतीच्या सर्व उमेदवारांची मी गॅरंटी घेणार


शिर्डी लोकसभेसाठी महायुती जे निर्णय घेईल पक्षाचे कार्यकर्ते ते मान्य करतील.दक्षिणेत राधाकृष्ण विखे निवडणुक लढणार अशी चर्चा असल्याने चर्चा तर सर्व बाबतीत असते असं विखे पाटलांनी म्हटल असून महायुती म्हणून आम्ही निवडणूक लढवणार जे महायुतीत असतील त्यांची सर्वांची गॅरंटी मी घेणार असं देखिल विखे पाटलांनी म्हटलं आहे.