दरम्यान शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राधाकृष्ण विखे पाटील यांना शिवसेनेत येण्याचे आवाहन केले आहे. संजय राऊत याबाबत म्हणाले की, विखे पाटलांचे पुत्र सुजय विखे भाजपमध्ये आले होते तेव्हाच मी राधाकृष्ण विखे यांना शिवसेनेत या असे आवाहन केले होते. विखे शिवसेनेत आले तर त्यांचं स्वागतच आहे. आज सकाळपासूनच विखे सदाशिव लोखंडे यांच्या प्रचारात सहभागी झाले असून पुढेही ते लोखंडेंना मदत करतील. लोखंडे यांना त्याचा नक्कीच फायदा होईल.
VIDEO | विखे-पाटलांकडून शिवसेनेचा उघडपणे प्रचार सुरु | एबीपी माझा
याच प्रचारसभेत जलसंवर्धन मंत्री राम शिंदे यांनी काँग्रेसचे नेते राधाकृष्ण विखे पाटील भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार असल्याचे संकेत दिले आहेत. राम शिंदे म्हणाले की, काँग्रेसच्या विरोधी पक्ष नेत्यांचा (राधाकृष्ण विखे पाटलांचा) राजीनामा मंजूर झाला आहे. ते कुठं जाणार हे तुम्हाला माहीत आहे. अशोक चव्हाण म्हणत आहेत की, ते विखे पाटलांचं मन वळववण्याचा प्रयत्न करत आहेत. तर दुसऱ्या बाजुला विखेंचे पुत्र सुजय विखे म्हणत आहेत की, मी वडिलांना भाजपात आणणार.
VIDEO | राधाकृष्ण विखे पाटील यांना काँग्रेसकडून कारणे दाखवा नोटीस | एबीपी माझा