पुणे : काँग्रेसचे नेते राधाकृष्ण विखेंच्या घरात उभी फूट पडली आहे. कारण विखेंचे थोरले बंधू अशोक विखेंनी राधाकृष्ण विखेंवर गंभीर आरोप केले आहेत.


परदेशात असातना राधाकृष्ण विखेंनी प्रवरा शैक्षणिक संस्थेचं संचालकपद बळकावलं, असा दावा अशोक विखेंनी केला आहे. याशिवाय भाजप आणि राधाकृष्ण विखे यांच्यात साटंलोटं आहे. त्यामुळे त्यांना विरोधी पक्षपद मिळालं, असा सणसणाटी आरोपही त्यांनी केला.

युतीच्या काळात बाळासाहेब विखे सहकारमंत्री असताना अमित शहांना बँक घोटाळ्यातून वाचवलं होतं. त्याचं रिटर्न गिफ्ट म्हणून राधाकृष्ण विखेंना विरोधी पक्षनेतेपद मिळाल्याचा आरोपही अशोक विखेंनी केला. त्यामुळे विखे कुटुंबातील हा वाद आणखी रंगण्याची चिन्हं आहेत.

बाळासाहेब विखे पाटील हयात असताना अडीच वर्षांपूर्वी त्यांनी प्रवरा शैक्षणिक संस्थेची जबाबदारी माझ्याकडे सोपवली होती. त्यासाठी संस्थेच्या घटनेत बदल करण्यात आला होता. त्या बदलाबाबत धर्मादाय आयुक्तांकडे निर्णय प्रलंबीत असतानाच राधाकृष्ण विखे पाटील यांनी ओळखीचा वापर करत करुन संस्था बळकावली, असा घणाघाती आरोप अशोक विखेंनी केला.

पाहा व्हिडिओ :