‘नाफेड’ने 15 एप्रिलनंतर कोणत्याही प्रकारची तूर खरेदी करणार नसल्याचं पत्र जारी केलं आहे. 16 एप्रिलपासून तूर खरेदीची कोणतीच जबाबदारी आपली राहणार नसल्याचं म्हटलं नाफेडने पत्रात म्हटलं आहे.
मात्र तूर खरेदी करण्यासाठी आणखी सात दिवसांची मुदत वाढवून देण्यात आली आहे. 22 एप्रिलपर्यंत तूर खरेदी केली जाईल, असं सुभाष देशमुख यांनी सांगितलं.
आतापर्यंत 34 लाख टन तुरीची खरेदी झाली आहे. ही गेल्या 15 वर्षातील विक्रमी खरेदी आहे. येत्या काळातही शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा जास्त भाव मिळत नाही, तोपर्यंत तूर खरेदी करु, असं सुभाष देशमुख म्हणाले.
आतापर्यंत शेतकऱ्यांच्या फक्त अर्ध्या तूरीची विक्री झाली आहे. अजूनही अर्धी तूर शेतकऱ्यांकडे पडून आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होण्याची शक्यता होती.
संबंधित बातमी :