Purandar Crime News Updates: इतिहासामध्ये काका मला वाचवा असं आपण वाचलंय. पण पुरंदर तालुक्यातील वागदरवाडी येथे काका मला मारू नका असं म्हणण्याची वेळ एका पुतण्यावर आली आहे. पुरंदर तालुक्यातील (Purandar Taluka News) वागदरवाडी येथील काका पुतण्याचं जमिनीवरून वाद आहे. पुतण्या जमिनीत आल्याचे पाहून काकाने चक्क रॉकेल ओतून पुतण्याला पेटवून देण्याचा प्रयत्न केल्याचं समोर आलं आहे. हा व्हिडीओ सर्वत्र व्हायरल झाला आहे. या प्रकरणी गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे.


पुतण्याच्या अंगावर धावत असल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल


हातामध्ये पेटता टेंभा घेऊन काका आपल्याच पुतण्याच्या अंगावर धावत असल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. भास्कर त्र्यंबक भुजबळ यांनी जमिनीच्या वादातून पुतण्यला रॉकेल टाकून पेटवण्याचा प्रयत्न केला आहे. या प्रकरणी शारदा भुजबळ यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे.  ही घटना काल संध्याकाळी घडली. शारदा भुजबळ यांच्या शेतात भास्कर भुजबळ यांनी न विचारता उसाचे पीक घेऊन उस तोड सुरू केली होती. या ऊस तोडणीचे काम थांबविण्याकरता फिर्यादी आणि मुलगा स्वप्नील असे गेले होते. यावेळी भास्कर भुजबळ यांनी स्वप्निलच्या अंगावर रॉकेल टाकून पेटविण्याचा प्रयत्न केला. 


यामध्ये स्वप्नील आणि आई शारदा भुजबळ जखमी झाल्या आहेत. या घटनेनंतर काका भास्कर त्र्यंबक भुजबळविरोधात जेजुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला आहे. जेजुरी पोलिसांनी  गुन्हा नोंद केला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक करून पोलीस कोठडी घेतली आहे. 


शेतीच्या वादातून आपल्याच पुतण्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचं या व्हिडीओमधून दिसून येत आहे. यात काका भास्कर हे आपल्या हातात टेंभा घेऊन पुतण्या स्वप्नीलच्या अंगावर धावताना दिसत आहेत. सुरुवातीला भास्कर यांनी स्वप्नीलच्या अंगावर रॉकेल ओतलं. यानंतर हातातल्या टेंभ्यानं त्याला पेटवण्याचा देखील प्रयत्न केला. यावेळी काही लोकांनी वेळीच हस्तक्षेप केल्यानं घटना टळली.


या घटनेचा व्हिडीओ कुणीतरी शूट केला आहे. हा व्हिडीओ सर्वत्र व्हायरल होत आहे. हातामध्ये पेटता टेंभा घेऊन काका आपल्याच पुतण्याच्या अंगावर धावत असल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालाय. या प्रकरणी शारदा भुजबळ यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे.  ही घटना काल संध्याकाळी घडली असल्याची माहिती मिळाली आहे. 


पाहा व्हिडीओ