तसेच आगामी आंदोलनाची दिशा सुकाणू समितीच्या बैठकीनंतर ठरवणार असल्याचंही सांगण्यात आलं आहे. दरम्यान भविष्यात सरकारनं मागण्या मान्य केल्या नाही, तर पुन्हा एकदा आंदोलन पुकारू, असा इशारा आंदोलक शेतकरी धनंजय धनवटे यांनी दिली आहे.
पुणतांब्यातील शेतकऱ्यांनी 1 जूनपासून शेतकऱ्यांची कर्जमाफी, शेतमालाला हमीभाव यासह इतर मागण्यांसाठी संपावर जाण्याचा निर्णय घेतला होता. या संपाच्या आंदोलनाचं लोण सध्या संपूर्ण राज्यभर पसरलं आहे. राज्यभरात शेतकऱ्याची सरकारविरोधात उग्र निरदर्शनं सुरु आहे.
अनेक ठिकाणी शेतमाल बाजार समितीत दाखल होण्यास शेतकऱ्यांकडून विरोध होत आहे. त्यामुळे शेतकरी संपाची कोंडी फोडण्यासाठी मुख्यमंत्र्यांसोबत शुक्रवारी रात्री बैठक झाली. पण या बैठकीतील निर्णय शेतकऱ्यांना मान्य नसल्यानं, शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला.
उद्या पुणतांब्यातील शेतकरी मौन आंदोलन करणार आहेत. तसेच आगामी आंदोलनाची दिशा सुकाणू समितीच्या बैठकीनंतर ठरवणार असल्याची माहिती आंदोलक शेतकरी धनंजय धनवटे यांनी दिली.
दरम्यान, शेतकरी कर्जमाफीसाठी जीएसटीप्रमाणे विशेष आंदोलन बोलवावे अशी मागणीही आंदोलक शेतकऱ्यांनी केली आहे. शिवाय, सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य न केल्यास, पुन्हा एकदा सर्व गटतट विसरुन पुणतांब्यातून पुन्हा शेतकऱ्यांचा लढा उभारण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.