पुणे : एव्हरेस्ट पर्वत सर केल्याचा बनाव करणारं पुण्यातील राठोड दाम्पत्य पोलिस दलातून निलंबित झालं आहे. एव्हरेस्ट सर करणार पहिलं भारतीय जोडपं असल्याचा दावा तारकेश्वरी आणि दिनेश राठोड या दाम्पत्याने केला होता. परंतु हा दावा खोटा असल्याचं समोर आल्यानंतर दोघांनाही पोलिस दलातून निलंबित करण्यात आलं आहे.

पुण्याच्या कॉन्स्टेबल दाम्पत्याचा एव्हरेस्ट सर केल्याचा दावा खोटाः नेपाळ


 

राठोड दाम्पत्याचा दावा खोटा असल्याचं सांगतलं नेपाळ सरकारने त्यांच्यावर दहा वर्षांची बंदी घातली. नेपाळ सरकारने तशी नोटीस राठोड दाम्पत्याला पाठवली होती. यानंतर हा प्रकार पोलिस आणि देशाची इमेज बिघडवणारा असल्याचं पुण्याच्या पोलिस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी म्हटलं होतं. या कारस्थानामुळे त्यांच्यावर कारवाई करण्याचं आश्वासन रश्मी शुक्ला यांनी दिलं होतं.


राठोड दाम्पत्य हे पुण्याच्या शिवाजीनगर पोलिस स्टेशनमध्ये कार्यरत आहे. 30 वर्षीय तारकेश्वरी आणि दिनेश हे दोघंही 2006  मध्ये पोलिस सेवेत रुजू झाले. 2008 मध्ये ते विवाहबंधनात अडकले. लग्न झाल्यापासूनच एव्हरेस्ट शिखर सर करण्याचं स्वप्न उराशी बाळगल्याचं ते सांगतात. इतकंच काय, एव्हरेस्टवर पाऊल ठेवेपर्यंत अपत्यसुख अनुभवायचं नाही, अशी खूणगाठही त्यांनी मनाशी बांधली होती.



पुण्याच्या पोलीस दाम्पत्याकडून एव्हरेस्ट सर


मात्र एव्हरेस्ट सर केल्याचा बनाव त्यांच्या अंगलट आला. अखेर आज त्यांना पोलिस दलातून निलंबित करण्यात आलं आहे.